मसालेदार मासवडीसाठी लागणारे साहित्य:
बेसन
किसलेले खोबरे
मीठ
तीळ
शेंगदाणे
कांदा
लसूण
मिरची
मसालेदार मासवडी बनवण्याची कृती:
सर्वात आधी तीळ भाजून घ्या. यानंतर भाजलेले तीळ, शेंगदाणे, लसूण चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर हे सर्व मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट करा. हे मिश्रण बाहेर काढून पुन्हा मिक्सरमध्ये मिरची, तीळ, किसलेले खोबरे, जीरे, हळद हे देखील बारीक सारण करून घ्या.
यानंतर एक कढई घ्या आणि त्यात तेल गरम करत ठेवा तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, हिंग, हळद, लसूण पेस्ट परतून घ्या आणि त्यानंतर त्यात थोडे पाणी आणि मसाले मिक्स करा. यानंतर मिश्रणात बेसन घालून घोटा आणि काळजी घ्या की, मिश्रण जास्त पातळ होणार नाही.
यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन त्यावर तयार केलेले मिश्रण गोल आकारात पसरवून घ्या आणि त्याच्यावर आधी तयार केलेले सारण घाला. रोल करून त्याच्या वड्या कापून घ्या. या वड्या तुम्ही तळून किंवा रस्सा बनवून भाकरी किवा रोटीसोबत खाऊ शकता.