ओट्स हे आपल्या आरोग्यसाठी किती फायदेशीर असतात हे आपल्या सगळ्यांच माहित आहे. यामुळे दिवसातून एकदा तरी ओट्सचे सेवन करणे गरजेचे आहे. ओट्समध्ये अनेक पौष्टिक घटकांचा आणि जीवनसत्त्वांचा देखील समावेश असतो. पण काही लोक ओट्स खाण्यास नकार देतात यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय प्रथिनेयुक्त ओट्सने बनवलेला ओट्सचा उपमा.
ओट्स उपमासाठी लागणारे साहित्य:
ओट्स
कढीपत्ता
जिरे
मोहरी
आल्याची पेस्ट
लिंबाचा रस
मीठ
ओट्स उपमा बनवण्याची कृती:
सर्वात आधी एका बाजूला कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची, गाजर आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या. यानंतर पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा आणि त्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता यांची फोडणी द्या. नंतर पॅनमध्ये आल्याची पेस्ट आणि चिरलेली हिरवी मिरची टाका. यानंतर यात कांदा परतून घ्या आणि त्यात बारीक चिरलेल्या भाज्या मिक्स करा. त्यात चवीनुसार मीठ आणि हळद टाका आणि काजूचे बारीक तुकडे कापून ते सुद्धा त्यात परतून घ्या.
यानंतर भाज्या चांगल्या शिजण्यासाठी त्यात थोडे पाणी टाका आणि पाण्याला उकळी आल्यावर त्यात ओट्स टाका आणि ते छान शिजण्यासाठी ठेवा. पॅनमधील संपूर्ण पाणी शोषून झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाका. अशा प्रकारे स्वादिष्ट असा ओट्स उपमा तयार होईल याचा आस्वाद तुम्ही नाश्त्यासाठी घेऊ शकता.