चटकदार

श्रीकृष्णासाठी घरच्या घरी बनवा रुचकर दहीकाला; ही घ्या सोपी रेसिपी

Published by : Siddhi Naringrekar

जन्माष्टमी दिवशी श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दहीकाला बनवला जातो. त्याला गोपाळकाळा असेही म्हटले जाते. गोकुळाष्टमीच्या सणाचे महत्व भारतीय संस्कृतीत अनन्य साधरण आहे. संपूर्ण भारतभरात रात्री बारा वाजण्याची वाट लोक आतुरतेनं पाहतात आणि मग आपल्या लाडक्या गोविंदाच्या जन्माच्या उत्सव साजरा करतात. जन्माष्टमीला कृष्णाला दही, दूधाचा नैवेद्य दाखवला जातो. तर जाणून घेऊया याची सोपी रेसिपी

साहित्य

एक कप चुरमुरे

एक कप राजगिरा लाह्या

एक कप साळीच्या लाह्या

दोन कप ज्वारीच्या लाह्या

एक कप जाड पोहे

एक कप ताक

एक कप दही

अर्धा कप दूध

दोन हिरव्या मिरच्या

डाळिंब, पेरु, काकडी

एक इंच आले

ओल्या नारळाचे काप

मीठ

साखर

जिरे, हिंग

सर्वप्रथम लाहया चाळून हलक्या हाताने भाजून घ्यावा त्यात चुरमुरे आणि पोहे एकत्र करुन घ्यावे. आता एका भांड्यात अर्धा कप दूध, अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी घालून ताक बनवून घ्या. त्यानंतर लाह्या आणि चुरमुरे मिश्रणात लागेल तसे ताक घालून भिजवत जावे. चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी. त्यानंतर आले आणि दोन हिरव्या मिरच्यांची पेस्ट यामध्ये घालावी. त्यानंतर डाळिंबाचे दाणे, ओल्या नारळाचे काप, पेरुचे तुकडे, हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. हे सर्व मिक्स करुन, शेवटी तुपामध्ये फोडणी द्या मग आणखी दहीकाला खमंग लागेल.

Amit Thackeray : अमित ठाकरे वरळीमधून निवडणूक लढवणार का? म्हणाले...

Baramati | Supriya Sule | बॅनरवर सुप्रिया सुळेंचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख | Marathi News

Ramdas Athawale | 'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक'; रामदास आठवलेंची मागणी

Narayan Rane | शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंसाठी लोकसभेत खर्च? ; नारायण राणेंवर गंभीर आरोप

shirdi saibabatemple | शिर्डीत साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सुवर्णमुकुट अर्पण | Marathi News