चटकदार

स्वादिष्ट अंजीर अनारसे बनवा घरच्याघरी; जाणून घ्या रेसिपी

अनारसा हा पेस्ट्रीसारखा स्नॅक हा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे.

Published by : Dhanshree Shintre

अनारसा हा पेस्ट्रीसारखा स्नॅक हा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. हे भिजवलेल्या तांदळाची पावडर, गूळ किंवा साखर, तूप (स्पष्ट केलेले लोणी) आणि खसखस ​​यांच्यापासून तयार केले जाते.  गुळाचा अनारसा देखील विशेषत: पवित्र हिंदू महिन्यात आदिक मास (पुरुषोत्तम मास) दरम्यान बनविला जातो

अंजिरी अनारसेसाठी लागणारे साहित्य:

1/2 किलो तांदूळ, 1 वाटी खजूर, 2 वाटी अंजीर, 4 चमचे खसखस, अंदाजे 1/2 किलो तूप, 1 चमचा दूध किंवा केळी.

अंजिरी अनारसे बनवण्याची कृती:

एका पातेल्यात तांदूळ (तांदूळ शक्यतो जुना आणि जाडसर घ्या) ते स्वच्छ पाण्याने 4-5 वेळा धुवून घ्या नंतर त्यात पाणी घालून भिजत ठेवा. 3 दिवस त्यातील पाणी बदलत राहा. चौथ्या दिवशी तांदूळ चाळणीत काढून ते निथळून घ्या. पाणी संपूर्ण निथळल्यावर ते तांदूळ सुती कपड्यावर सावलीत सुकवत ठेवा. तांदूळ ओले, आंबट असतानाच मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. नंतर ते पीठाच्या चाळणीत चाळून घ्या. खजूर आणि अंजीर 15-20 मिनिटे पाण्यात भिजवून नंतर त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करुन घ्या.

पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करुन अंजीर आणि खजूरची पेस्ट पाण्याचा अंश जाईपर्यंत परतवत राहा. नंतर ते एका ताटलीत काढून थंड करुन घ्या. (पेस्ट खूप जास्त परतू नका नाहीतर मिश्रण कडक होऊ शकतं). तांदळाची पिठी आणि अंजीर-खजुराची पेस्ट व्यवस्थित एकत्र करून घ्या. कोरडे वाटल्यास मिक्स केलेले पीठ मिक्सरमधून वाटून घ्या. चांगले मिक्स झाल्यावर त्याचे गोळे बनवा आणि पॅकबंद डब्यात 4 दिवस - ठेवा. 4 दिवसांनंतर त्यातील एक गोळा छान मळून घ्या. कोरडे वाटल्यास 1-1 चमचा दूध किंवा गरजेनुसार केळी घाला. अनारसे करताना पिठात 1-2 चमचे तुपाचे मोहन घालून छोटे छोटे गोळे बनवून घ्या. पोळपाटावर खसखस पसरवून त्यावर हे गोळे (अनारसे) थापून घ्या. अनारसे तळण्यासाठी कढईत तूप गरम करा. खसखसवाली बाजू वर येईल अशा पद्धतीने अनारसे तुपात सोडा. झाऱ्याने अनारशावर तूप घालत अनारसे तळून घ्या. खुसखुशीत अनारसे तयार होतील.

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...