उपवास असला की आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो. साबुदाण्याचे वडे, वरीचा भात , शेंगदाण्याची आमटी आणि बटाट्याची भाजी, साबुदाणा खिचडी असे अनेक पदार्थ आपण करतो. आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत साबुदाणा अप्पे कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
१ वाटी साबुदाणा (भिजवलेला)
२ बटाटे (उकडलेले)
३-४ हिरव्या मिरच्या
१ वाटी शेंगदाणे (भाजलेले)
मीठ चवीनुसार
एका भांड्यात भिजवलेला साबुदाणा, बटाटा, वाटलेल्या मिरच्या, शेंगदाण्याचे कूट आणि मीठ टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.या मिश्रणाचे लहान-लहान गोळे तयार करून एका प्लेटमध्ये ठेवा.आता गॅसच्या मंद आचेवर अप्पे पात्राला तेल लावून तापत ठेवा.
भांडे गरम झाल्यावर त्यातील प्रत्येक खणात एक एक साबुदाण्याचा गोळे ठेवा. झाकण ठेवा आणि दोन्ही बाजून नीट खरपूस होईपर्यंत शिजू द्या. वरुन थोडं तेल सोडा ज्यामुळे साबुदाणा आप्पे भांड्याला चिकटणार नाहीत. तयार आहेत साबुदाणे अप्पे, चटणीसोबत सर्व्ह करा.