चटकदार

घरच्याघरी बनवा चायनीज पद्धतीने राइस फ्लोर रुट्स मोमोज...

तांदळाच्या पिठाने बनवलेले मोमोज हे कोबी, गाजर आणि कांदे यांसारख्या बारीक चिरलेल्या भाज्यांच्या मिश्रणाने भरलेले लोकप्रिय डिश आहे.

Published by : Dhanshree Shintre

तांदळाच्या पिठाने बनवलेले मोमोज हे कोबी, गाजर आणि कांदे यांसारख्या बारीक चिरलेल्या भाज्यांच्या मिश्रणाने भरलेले लोकप्रिय डिश आहे. ते तांदळाच्या पिठाच्या पिठापासून हलके आणि नाजूक पोत देतात, भाजीच्या भरावातून एक मसालेदार आणि हलके मसालेदार चव देतात. परिपूर्णतेसाठी वाफवलेला, हा एक परिपूर्ण नाश्ता आहे.

आवरणासाठी साहित्य : 1 कप कोनफळ, 1 कप रताळे, 1 कप करांदे (उकडून, साले काढून केलेल्या फोडी), चवीनुसार मीठ, 1/4 छोटा चमचा मिरपूड, 1/4 छोटा चमचा सोया सॉस.

सारणासाठी साहित्य : प्रत्येकी 1/4 कप सिमला मिरची, गाजर, बीट, टोमॅटो, कोबी, पातीचा कांदा (बारीक काप केलेला), 1/2 छोटा चमचा मिरपूड, 1 छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, 1/4 छोटा चमचा सोया सॉस, लिंबाची 9 पाने, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा कप बासमती तांदूळ आणि चवीनुसार मीठ.

राइस फ्लोर रुट्स मोमोज बनवण्याची कृती:

प्रथम बासमती तांदूळ तासभर पाण्यात भिजत ठेवा. कोनफळ, रताळे, करांदे चांगले कुस्करून त्यात मीठ, मिरपूड घालून मळून त्याचा एक गोळा तयार करुन घ्या. एका बाऊलमध्ये मिरची, गाजर, बीट, टोमॅटो, कोबी, पातीचा कांदा, हिरवी मिरची, मिरपूड, आले-लसूण पेस्ट, सोया सॉस आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण हलकेच एकजीव करा.

तांदूळ निथळून घ्या आणि एका ताटलीत पसरवा. आता मळलेल्या गोळ्यामधले 2 मोठे चमचे मिश्रण हातावर घेऊन त्याची वाटी करा व सारण भरून हलकेच बंद करून लांबट आकाराचा गोळा तयार करा. अशा प्रकारे सर्व गोळे तयार करा. आता गॅसवर मोठी कढई ठेऊन त्यात 2 कप पाणी उकळायला ठेवा. एक चाळण घेऊन त्यात लिंबाची पाने पसरवा. तयार केलेला गोळा तांदळावर घोळवून घ्या व चाळणीत ठेवून 20 मिनिटे वाफवून घ्या. अशा प्रकारे तयार होईल राइस फ्लोर रुट्स मोमोज. हे मोमोज शेजवान चटणीसोबत सर्व्ह करा.

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news