चटकदार

दिवाळीत घरच्या घरी नमकीनमध्ये आलू भुजिया बनवा

दिवाळीत घरोघरी मिठाई आणि विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात.

Published by : Siddhi Naringrekar

दिवाळीत घरोघरी मिठाई आणि विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. घरातील महिला काहीतरी नवीन आणि खास करण्यात व्यस्त असतात. या दिवाळीत घरच्या घरी नमकीन बनवायचा असेल तर बटाट्यापासून बनवलेल्या रेसिपी वापरून बघा. बटाट्याचा स्नॅक्स सर्वांनाच आवडतो. या दिवाळीत बाजारासारखा आलू भुजिया घरीच बनवा.

आलू भुजिया बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

बटाटा - 2

बेसन - दीड वाटी

तांदळाचे पीठ - अर्धी वाटी

जिरे पावडर - अर्धा टीस्पून

चाट मसाला - १ टीस्पून

हळद - 1/4 टीस्पून

गरम मसाला - अर्धा टीस्पून

लाल तिखट - 1 टीस्पून

आमचूर - अर्धा टीस्पून

तेल - प्रमाणानुसार तळण्यासाठी

मीठ - चवीनुसार

आलू भुजिया बनवण्यासाठी आधी बटाटे उकडून सोलून घ्या. एका भांड्यात बटाटे किसून घ्या आणि त्यात बेसन, तांदळाचे पीठ घालून सर्व साहित्य चांगले मिसळा. आता त्यात जिरे पावडर, गरम मसाला, चाट पावडर, हळद, लाल तिखट आणि आमुचर घालून चांगले मॅश करा. यानंतर चवीनुसार मीठ घालून २ चमचे तेल घालून मिक्स करा.

भुजिया बनवण्यासाठी साचा घ्या आणि तेल लावा. यानंतर एक कढई घ्या, त्यात तेल टाका आणि मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर भुजियाच्या साच्यात तयार पीठ भरा आणि कढईत भुजिया बनवत राहा. भुजियाचा रंग सोनेरी तपकिरी होऊन कुरकुरीत होईपर्यंत तेलात तळून घ्या.

IPL Mega Auction 2025 Live: लाखांच्या कसोटीत झाला "या" खेळाडूंचा लिलाव

Laxman Hake OBC : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून मंत्रिपदाची मागणी

Mumbai Indians IPL Mega Auction 2025 : "या" 18 वर्षीय खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सचा हट्ट कायम, कोण आहे हा खेळाडू?

गोपाळ शेट्टींना बोरिवली पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण काय?

Latest Marathi News Updates live: संगमनेरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग