नुकतीच नवरात्र पार पाडली देवीच्या शक्तीपीठांची महती या नवरात्रोत्सवनिमित्त आपण जाणून घेतली नवरात्री झाल्यानंतर येते ती कोजागिरी पौर्णिमा. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खुप महत्वाचे स्थान आहे. अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 ला साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी खीर आणि मसाला दूध केले जाते तुम्ही सुद्धा घरच्याघरी बनवा स्वादिष्ट खीर.
तांदळाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
150 ग्रॅम तांदूळ
दूध
ड्रायफ्रुटस
साखर
केसर
विलायची पावडर
तांदळाची खीर बनवण्याची कृती:
सर्वप्रथम एका भांड्यात दूध उकळवायला ठेवा. यानंतर तांदूळ 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि उकळलेल्या दूधात टाका. यानंतर तांदूळ फुगेपर्यंत आणि शिजेपर्यंत ते ढवळत राहा. यानंतर त्यात साखर टाका आणि ड्रायफ्रुटस छान बारिक कापून घ्या आणि ते देखील तयार होत असलेल्या खीरमध्ये टाका. यानंतर त्यात वेलची पावडर आणि केशर टाका आणि 5 ते 10 मिनिटे मंद आचेवर शिजवा आणि रात्री चंद्राच्या प्रकाशात खीर ठेवून आपल्या कुटुंबासह खीरीचा आस्वाद घ्या.