चटकदार

ड्राय चिली पनीर आता घरीच बनवा, 'ही' घ्या रेसिपी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dry Chilli Paneer : अनेकदा व्यस्त जीवनशैलीमुळे काही वेगळे बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु, इंटरनेटवर तुम्हाला अशा अनेक रेसिपीज मिळतील ज्या किचनमध्ये क्षणार्धात बनवल्या जाऊ शकतात आणि झटपट बनवण्यासोबतच ते हेल्दी आणि टेस्टी देखील असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रेसिपीबद्दल सांगणार आहोत. ही बनवायला खूप सोपी आहे आणि जास्त वेळही लागत नाही. ही डिश म्हणजेच ड्राय चिली पनीर.

साहित्य :

पनीर, तेल, आले, लसूण, कांदा, शिमला मिरची, सोया सॉस, टोमॅटो केचप, साखर, मीठ आणि काळी मिरी, व्हिनेगर, हिरवी मिरची, कांदा पात

रेसिपी :

ड्राय चिली पनीर बनवण्यासाठी प्रथम पनीर थोड्या तेलात तळून घ्या जेणेकरून ते तुटू नये. हे पनीर मऊ होण्यासाठी तळून घेतल्यावर कोमट पाण्यात काही वेळ भिजवावे. यानंतर थोडे तेल गरम करून त्यात आले, लसूण, कांदा, सिमला मिरची, हिरवी मिरची, सोया सॉस, टोमॅटो केचप, साखर, मीठ आणि काळी मिरी घालून तळून घ्या. आता त्यात थोडं व्हिनेगर घालून मिक्स करा. ही ग्रेव्ही थोड्या वेळ झाकून ठेवा. शेवटी त्यात चिरलेली कांदा पात घालून गरमागरम सर्व्ह करा.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा