दररोज नाश्त्यामध्ये कोणता नवीन पदार्थ बनवायचा असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. तुम्ही आत्तापर्यंत केळीचे वेफर्स आवडीने खाल्ले असतील, परंतु आज आम्ही तुम्हाला केळ्याची भजी कशी करायची हे सांगणार आहोत.
केळ्याच्या भजीसाठी लागणारे साहित्य:
2 कच्ची केळी
1 चमचा मसाला
1 चमचा हळद
1 चमचा धने पावडर
कॉटिंग साठी -एक मोठी वाटी बेसन
2 चमचे तांदळाचे पीठ
1 चमचा चिली फ्लेक्स
1/2 चमचा हिंग
1/2 चमचा हळद
2 हिरव्या मिरच्या बारीक कापून
थोडी कोथिंबीर
चवीप्रमाणे मीठ
तळण्यासाठी तेल
केळ्याची भजी तयार करण्याची कृती:
प्रथम केळी स्वच्छ धुऊन त्याचे साल काढून घ्यावे व त्याचे थोडे क्रॉस असे काप करून पाण्यात ठेवावे. दहा मिनिटानंतर काप एका ताटात घेऊन त्यात मसाला, हळद, पावडर व थोडे मीठ लावून चांगले मिक्स करून घ्या. एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, हळद, चिली फ्लेक्स, हिंग, हिरवी मिरची, कोथिंबीर व चवीप्रमाणे मीठ घालून घ्या.
बेसनमध्ये थोडे-थोडे पाणी घालून कव्हरसाठी मिश्रण तयार करून घ्या नंतर मसाला लावलेले काप त्यात बुडवून कढईत तळून काढा. गरमागरम केळी भजी तयार होईल. स्पेशली ही भजी केरळ मध्ये मिळते.