Jowar Appe google
चटकदार

'ज्वारीचे आप्पे' तुम्ही कधी खाल्ले आहेत का? अगदी थोड्या वेळात झटपट बनवा घरच्याघरी ज्वारीचे खमंग आप्पे...

जेवणात ज्वारीचा समावेश केल्याने शरीरातील लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. तर ज्वारीचे सेवन केल्याने शरीरास प्रोटिन्स देखील उपलब्ध होतात. ज्वारीच्या भाकरी सोबतचं ज्वारीचे आप्पे' तुम्ही कधी खाल्ले आहेत का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय चमचमीत 'ज्वारीचे आप्पे' कसे बनवायचे याची रेसिपी.

Published by : Team Lokshahi

ज्वारीचे आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

ज्वारीचे पीठ

किसलेले गाजर

कांदा

हिरवी मिरची

इनो

पोहे

खोबर्याचे तुकडे

दही

आले आणि लसूण

कोथिंबीर

तिखट मसाले

ज्वारीचे आप्पे बनवण्याची कृती:

सर्वप्रथम एक मोठा कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरुन घ्या. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, किसलेले गाजर, आले लसूण हे एकत्र करून घ्या. त्यात ज्वारीचे पीठ घालून ते एकत्र मिसळून घ्या. गरजेनूसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून पीठ चांगले मळून घ्या. यानंतर त्यात दही घालून पीठ 15मिनीटे बाजूला ठेवा. नंतर त्यात पोहे घालून मिश्रण एकत्रीत करा. त्यात इनो टाका. नंतर आप्पे पात्राला तेल लावून तयार केलेल मिश्रण आप्पे पात्रात थोडे थोडे टाका. आप्पे पूर्ण शिजल्या नंतर गरम गरम आप्पे चटणीसह एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही गरम गरम ज्वारीचे आप्पे खाऊ त्यांचा आनंद लुटू शकता.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश