गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येक जण आता आतुर झालेला आहे. बाप्पा घरी आला की, प्रत्येकाच्या घरी काही ना काही गोडाचा पदार्थ हा तयार होतचं असतो. त्यात पण उकडीचे मोदक म्हणजे त्याला कोणत्याच प्रकारचा तोड नाही. बाप्पासाठी उकडीचे मोदक तर आपण करतोच पण बाप्पासमोर मिठाई देखील ठेवली जाते. अशावेळेस आपण बाहेरून विकत घेतलेली मिठाई बाप्पासमोर ठेवतो. पण आम्ही तुमच्यासाठी मावा मोदक कसे करायचे याची रेसिपी घेऊन आलो आहे. यावर्षी बाप्पासाठी मिठाई विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी मावा मोदक तयार करा.
मावा मोदकसाठी लागणारे साहित्य:
साखर
दूध
तूप
वेलची पावडर
तेल
काजू
बदाम
मावा
केशर
मावा मोदक बनवण्याची कृती:
सर्वात आधी एक कढई घ्या आणि त्यात तूप गरम करून घ्या. एका बाजूला 3 चमचे कोमट दुधात केशर घाला आणि नीट ढवळून घ्या. यानंतर दूध मंद आचेवर शिजवा आणि ढवळत राहा. तापवलेले दूध आणि केशर दूध गरम केलेल्या तूपात मिक्स करून घ्या. मिश्रण घट्ट होईपर्यंत ते ढवळत राहा. आता दिड कप पिठीसाखर आणि वेलची पावडर तयार केलेल्या पिठात मिक्स करा.
यानंतर तयार केलेले पिठ एकदा हलक्या हाताने मळून घ्या. यानंतर त्यात काजू आणि बदाम बारिक चिरून मिक्स करा. यानंतर मोदकाच्या साच्यात लहान लहान गोळे करून ते छान साच्यात मोदकाच्या आकारात तयार करा शेवटी त्याच्यावर सिलव्हर कागद लावून मावा मोदक तयार करा. अशाप्रकारे बाप्पाच्या समोर मिठाई ठेवण्यासाठी तुम्ही केलेले मावा मोदक तयार होतील.