साहित्य
एक कप मैदा
पिठीसाखर, दूध पावडर
बेकिंग पावडर
व्हॅनिला एसेन्स
दूध
न्यूट्रेला
कोको पावडर, कॉफी पावडर
मध
मीठ
कृती
एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, पिठीसाखर, दूध पावडर, कोको पावडर, कॉफी पावडर, मीठ चाळून घ्या.
नंतर त्यात दूध, मध घाला आणि हे मिश्रण एकजीव करून घ्या.
एका पॅनमध्ये तेल घाला आणि तयार मिश्रण पॅनकेकप्रमाणे तव्यावर पसरवून घ्या.
दोन्ही बाजूने हा चांगला भाजून घ्या. तुमचा डोरा केक तयार झालेला दिसेल.
त्यानंतर प्लेटमध्ये डोरा केक घ्या त्यावर न्यूट्रेला पसरवा आणि त्यावर पुन्हा एक डोरा केक ठेवा आणि प्रेस करा.
अशाप्रकारे तुमचा चॉकलेट डोरा केक तयार होईल.