Pune Crime Team lokshahi
इतर

Pune | माणुसकीला काळीमा फासणारी घटना, हॉटेल चालकाने अंगावर ओतले उकळलेले गरम पाणी

दोन जणांचा जागीच मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक

Published by : Shweta Chavan-Zagade

चंद्रशेखर भांगे | पुणे : पुण्याजवळ (Pune) असलेल्या सासवड शहरात माणुसकीला काळीमा फासण्याची घटना घडली. तिघा कचरावेचक भिक्षेकरूना पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप या गुंड हॉटेल (hotel) चालकाने बेदम मारहाण करून त्यांच्या आंगावर उकळतं पाणी टाकून त्यांचा खून केला आहे. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू तर 60 वर्षाय शेवंताबाई जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना 23 मे ला घडली असून प्रशासनाने हासगळा प्रकार दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सासवड पोलिसांची (Saswad police) मात्र माध्यमांना बोलणास टाळाटाळ केली. मात्र लोकशाही न्यूज च्या हाती माहिती लागल्यानंतर ही घटना उघडकीस आणली आहे. तीनही कचरावेचक दिवसभर सासवड मध्ये कचरा वेचून उदरनिर्वाह करत होते.

पुण्यातील सासवड शहरात तीन भिक्षेकरी निलेश जयवंत जगताप (Nilesh Jaywant Jagtap) यांच्या हॉटेल जवळ असलेल्या अहिल्यादेवी मार्केट जवळ ओसरीवर दररोज बसत होते. हाच राग मनात आणून जगताप यांनी या तिघांना सर्वप्रथम काठीने मारहाण केली. या मारहाणीत निपचीत पडलेले भिक्षेकरिता तडफडत पडलेले भिक्षेकरी अजून कसे गेले नाहीत म्हणून जगताप याने त्याच्या हॉटेलमधील गरम पाणी या तिन्ही भिक्षेकरीच्या अंगावर फेकले. या तिन्ही भिक्षेकरी पूर्णता भाजून निघाले. तर शेवंताबाई जाधव (60) यांचा हात भाजला तर दोन वयोवृद्वयोवृद्धाचा नराधम जगताप याने खून केला. या घटनेनंतर 36 तास त्याठिकाणी मृतदेह निपचीत तडफडत पडले होते. दरम्यान ही घटना पोलीस सासवड पोलिस स्टेशनच्या अगदी जवळच असलेल्या घटनास्थळी घडली. मात्र यावेळी पोलिसांनी ढुंकूनही पाहिले देखील पाहिले नाही. हा सगळा प्रकार स्थानिक नागरिकांनी पाहून उघडकीस आणला आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय