पावसाळा म्हटले की पावसाळ्यात पावसाच्या पाण्यासोबत अनेक प्रकारचे संसर्ग देखील पसरतात. यावेळी आजूबाजूच्या असणाऱ्या थंडावामुळे अन्नपदार्थ देखील लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते. यासोबतच किचनमध्ये ठेवलेल्या पीठ आणि अन्नधान्य आणि मसालेही खराब होण्याची शक्यता असते. काहीवेळा पीठात येणारे किडे पडतात. पावसाळा ऋतू हा अनेकांना आवडतो. मात्र, पावसाळ्यात वाढणारी उष्णता आणि आर्द्रताही अनेकांसाठी त्रासदायक ठरते. तर या सर्व मसाल्यांची तुम्ही कशी काळजी घ्याल काही सोप्या टिप्स तुम्ही फॉलो करा
धान्य सूर्यप्रकाशात ठेवा
धान्यातील कीटक काढून टाकण्यासाठी त्यांना सूर्यप्रकाश दाखवावे. सूर्यप्रकाश मिळताच धान्यातील सर्व किडे बाहेर येऊन पळून जातात.
कडुलिंबाची पाने ठेवा
कडुलिंबाची पाने सुकवून रवा, मसाल्यात किंवा धान्यांत ठेवा. तसेच हे सर्व खाद्यपदार्थ हवाबंद डब्यात बंद केल्यानंतरच ठेवावेत हे लक्षात ठेवा.
मोहरीचे तेल वापरा
१ चमचा मोहरीचे तेल कडधान्यात मिसळून सूर्यप्रकाशात ठेवल्याने किडे आपोआप नाहीसे होतील आणि तुमचे धान्य ओलसर होण्यापासूनही वाचेल. तांदूळ आणि पीठ, डाळी यांना किडे आणि ओलसरपणापासून दूर ठेवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर खूप उपयुक्त ठरू शकतो.
हळदीकुंडचा वापर
कडधान्याच्या पेटीत ४ ते ५ हळदकुंडच्या गाठी घाला. हळदीच्या तीव्र वासामुळे किडे काही वेळातच नाहीसे होतात आणि पुन्हा किडे होण्याची संभावना देखील कमी असते.