नवरात्रीच्या उपवासात, लोक बहुधा फळे, बटाट्याची करी, भाजी खातात. पण या नवरात्रीत तोंडाची चव बदलण्यासाठी टेस्टी साबुदाणा टिक्की करुन पहा. या मसालेदार रेसिपीमुळे तुमचा उपवासात मजा येईल. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये साबुदाणा वापरला जातो. साबुदाणा खायला चविष्ट आणि आरोग्यदायी तर आहेच पण पचायलाही हलका आहे. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवायची ही टेस्टी साबुदाणा टिक्की.
साबुदाणा टिक्की बनवण्यासाठी साहित्य-
- साबुदाणा 500 ग्रॅम
तेल दीड वाटी
उकडलेले बटाटे २
हिरवी मिरची ३
- कोथिंबीर वाटी
मीठ चवीनुसार
लाल मिरची पावडर टीस्पून
- शेंगदाणे कप
साबुदाण्याची टिक्की कशी बनवायची -
साबुदाण्याची टिक्की बनवण्यासाठी प्रथम साबुदाणा नीट धुवून घ्या आणि २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा. तसेच बटाटे दुसऱ्या बाजूला उकडण्यासाठी ठेवा. साबुदाणा चांगला भिजला आणि थोडा फुगला की त्याचे पाणी गाळून वेगळे करा. आता एका मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे घेऊन चांगले मॅश करा.
यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, खडे मीठ आणि भिजवलेला साबुदाणा एकत्र करून घ्या. आता कढईत तेल गरम करा. आता तेलात साबुदाणा आणि बटाट्याच्या मिश्रणाने बनवलेल्या छोट्या टिक्की सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. या टिक्की तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करू शकता.