हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा 16 मार्च ते 22 मार्च या आठवड्यातील तुमचे भविष्य.
मेष
अहो विचार काय करत बसलाय आता कामाला लागा नाही तर वेळ निघून जाईल कामाला यश देणारा सप्ताह आहे. कामातून भाग्य मिळवून देणारा सप्ताह व ह्या सोबत आर्थिक लाभ मिळवून देणारा. नोकरी हवी प्रयत्न करा. छोकरी हवी तर प्रयत्न करा. कामे हवीत प्रयत्न करा आणि यश मिळवा. इच्छा हवी प्रयत्न हवे.
वृषभ
वेळ नाही,वेळ नाही, अजिबात वेळ नाही असे बोलून चालणार नाही इतर सर्व कामे नंतर कुटूंबासाठी वेळ काढवीच लागेल. हा सप्ताह कुंटूब कार्यासाठी आहे. घरातील मुलामुलींचे विवाह करावयाचे आहे. पाव्हणे मंडळी येणार आहेत तयारी करा . विवाह इतर मंगल कार्यसंपन्न होतील स्वागताची तयारी करा.
मिथुन
खुप काळजीत आहात प्रयत्न करूनही समस्या सुटत नाही काय करावे सुचत नाही. मग काय हातावर हात धरून बसणार का प्रथम मातृ चे कार्य करा. मातृकडे दूर्लक्ष करू नका. मातृकार्यातूनच आपली समस्या सुटणार आहे . प्रवास करतांना गाडीची कागदे सोबत ठेवा. हवलदार गाडीची कागदे मागतील घरास कुलूप लावून बाहेर जावू नका.
सिंह
मनाविरूद्ध कामे होतच असतात प्रत्येक वेळा सारखी नसतात. आपले पण चुकत असते. म्हणून आपण आपल्या वर रागावतो का नाही. संताप करून कामे होतात का नाही ना ! मग संताप न करता कामं कशी संपन्न करता येतील ह्याकडे लक्ष द्या व आर्थीक कामें लवकर करा.
कन्या
सर्वच सारखे दिवस नसतात काही कामे होतील तर काही कामे होणार नाहीत असे नाही. त्यात अडचणी येतील, तर प्रयत्न करावे लागतील. आपण विवाह स्थळांना नकार दिला आहे व त्यानंतर स्थळे आली नाहीत. जुने स्थळ आलेल आहेत तर पुर्न विचार करून बघा व स्वतःचा विचार करा. वयाकडे लक्ष द्याल. कायद्याचे प्रश्न आपले बाजूने असतील.
तुळ
आपण अतिउत्साह दाखवू नका. उतावळेपणा नको, विचार करा, शांत बसा कार्याचा आढावा घ्या मगच निर्णय घ्यावा. जोखमीची कामे स्वतःकरावीत. मोठ्या खरेदीचे योग आहेत परंतु कायद्याची बाजू बघूनच खरेदी करा. जुने वाहन जुने वस्तु खरेदी करू नका. मातृस अवजड कामे सांगू नका जखम होण्याची संभावना.
वृश्चिक
दर सप्ताहात भाग्य लाभ पण भाग्य तर नाहीच परंतू तसे वातावरण पण नाही. भाग्य कधी मिळणार वाट बघून थकलात. आता वाट बघायची नाही प्रत्यक्ष भाग्य खातेत भाग्याचा चेकचा भरणा होईल. मोठी खरेदी कुंटूब प्रवास होतील. आनंदाचा लाभ होईल.
धनु
जरा शांत, वादळ वारेत गोड फळे झाडावर टिकत नाही. शांत वातावरण हेच भाग्याकडे घेवून जात असते. भाग्याची पावल शांत असतात. धावाधाव त्यात नसतात. उणे दूणे नको. सर्व काही आशीर्वादाचे मग आपणास यश तर मिळेलच व सामाजीक प्रतिष्ठापण आपण मिळवाल . नकार देणारे सुध्दा आश्चर्यचकित होतील असा हा सप्ताह आहे. यशाचा सुंगध सर्वत्र दरवळणारा आहे.
मकर
प्रयत्नाला भाग्याची साथ कशी लाभते ह्याचा अनुभव आपणाला ह्या सप्ताहात येणार आहे. प्रयत्नाने यश मिळते परंतु त्याला आशीर्वाद पण लागतात. सर्व नवे सर्व अदभूत समोर यश. मग विचार करून वेळ घालवू नका .यशाकडे झेप घ्या यश आपलेच आहे.
कुंभ
विचार करूनच निर्णय घेतला आहे मग विचार कसला करताय आता विचार नाही आता कर्तव्य करा यश मिळवा हेच गणित आपले आहे. हाची साथ इतरांचे आशीर्वाद इश्वराची कृपा आपली मेहनत मग हा प्ताह आपणास अदभूत यश मिळून देणारा असणार आहें . भाग्य सप्ताह राहील.
मीन
प्रथम आरोग्याचा विचार नंतर काम. कामे तर करायचीच आहे. कामे करण्यास शरिर सुदृढ हवे. ह्याचा विचार करून प्रकृतीस पेल इतकीच कामे करावीत. गील अडकलेला पैसा मोकळा होइल .कुटूंबविचाराबाबत ठाम रहावे. गुंतवणूक भाग्य कारक ठरेल . संतती पुरस्कार मिळवेल
शुभाशुभ
दिनांक १६ मार्च शुभ दिवस
दिनांक १७ मार्च वर्ज दिवस
दिनांक १८ मार्च करिदिन
दिनांक १९ मार्च चांगला दिवस
दिनांक २० मार्च शुभ दिवस
दिनांक २१ मार्च क्षय दिवस
दिनांक २२ मार्च अनिष्ट दिवस
>>>>> शुभमुहूर्त >>>>
साखरपुडा दिनांक १६ / १९/२०
बारसे दिनांक १९ / २०
जावळ दिनांक .. २०
गृहप्रवेश १९ / २० / 2 ३ / २५ / ;
>>>> विवाह मुहूर्त >>>>
दिनांक १६ / १९ / २० / –
>>>>>सणवार >>>>
दिनांक १६ मार्च घबाड दिवसा१३=४०पावेतो
दिनांक १७ मार्च होळी
दिनांक १८ मार्च धुली वंदन
दिनांक १९ मार्च वसंतोत्सव
दिनांक २०मार्च श्री संत तुकाराम महाराज .बीज
दिनांक २१ मार्च श्री संकष्ट चतुर्थी
दिनांक २२ मार्च रंगपंचमी
>>>> >>>> एकाग्रता उपासना >>>>>
परिक्षांचा काळ .विद्यार्थी वर्गास एकाग्रतेची जरूरी . अनुभव घ्यावा अनुभव कळवावा
श्री गणपती मंदीरात सकाळी
१0चे आत जा . तिथे १०रू चलननाणे
टाका दुसरेदहाचे नाणे मंदीरातीलदिव्यात बुडवा हाती घ्या .डावे हातावर ठेवा .व उजवा हात त्यावर ठेवा .
ओंमनायका
बुध्दीदायका
.विद्याधारका
मम बुद्ध
मम .विद्या
मम चित्त
मम मन
मम एकाग्रता
प्रभावतेय . प्रभावतेय
श्रीगणेशायनमो नमाय
असामंत्रजाप करा
समोर हे नाणे ठेवून अभ्यास करा