अध्यात्म-भविष्य

weekly Horoscope | साप्ताहिक राशीभविष्य वाचा कसा असेल तुमचा हा आठवडा

Published by : Team Lokshahi

हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा 23 मार्च ते 31 मार्च या आठवड्यातील राशीभविष्य

मेष 
भाग्यकारक सप्ताह आपणास हवे ते मिळणार.कार्य करा यश मिळवा व यशासोबत लाभ पण मिळवा. राजकीय नेत्यांना अतिउत्तम सप्ताह असेल, आपण जे कराल त्याची दखल हायकमांड घेतील. विद्यार्थी वर्गास उत्तम.दूरवर प्रवास कराल. तिर्थाटनपण कराल.

 वृषभ 
प्रेमविवाह करणारे वर्गाने आपले मनातील भावना आई-वडिलांना सांगून टाका.डोक्यावरचे टेंशन मिटवा. यात्रा कंपनी, वाहन उद्योग हौसे मौजेच्या वस्तु विक्रेते यांना भरभरून लाभ मिळेल. विद्यार्थी वर्गास सहली ट्रीप निमित प्रवास घडेल.

 मिथुन 
विचार करत वेळ घालवू नका, कार्याची सुरवात करा. कार्य उत्तम होईल व आर्थिक लाभ पण मिळेल. अविवाहीतांचे विवाह ठरतील. उगाच धावपळ करू नका, सर्व काही मनाप्रमाणे होईल. शारीरीक त्रास होईल.

 कर्क
आता घाबरण्याचे कारण नाही शत्रु बिळात जाऊन बसलेले आहे. दे देधडक / बेधडक कार्यारंभ करा. नविन काही करून दाखवा. आपले कौतूक होईल. प्रमोशन मिळेल. विवाहयोग बलवत्तर आहे. अनेकांचे विवाह जमतील शेतकरी वर्गात उतम सप्ताह.

 सिंह 
रागाचा पारा चढू देऊ नका. कार्य करा व कार्य पार पाडा राजकारणातल लक्ष घालू नका व वेळ पण घालवू नका. नको त्यांची कामे पदरमोड करून करावी लागतील प्रवास शक्यतोवर टाळावा. घरास कुलूप लावून बाहेरगावी जावू नये.

 कन्या
नौकरी इच्छुकांनी प्रयत्न करावे नोकरी मिळेल. कामे मिळतील गुरूजन पुजारी ह्यांना उतम सप्ताह कायद्याची अडचण ऐनवेळी उभी राहील. फसवणूक संभावना लोभात पडू नका. वाद कुणाशी ही करू नका.

तुळा 
उत्साह अंगी शिरेल लागोपाठ कामे हातावेगळी कराल. आर्थिक समस्या मिटतील उधार उसनवारी वसुल होईल. घरातील वृध्द मंडळींचे आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. वार्ता आनंदाची प्राप्त होईल.

वृथिक 
काय भाग्य. हेवा करावा असा भाग्य. लाभ विषय कुठलेही असो, कामे, कुठलिही असो, त्यात यश, विजय आयलाच, विरोध करणारे पळून जातील. पैसा आर्थिक यश आपण मिळवाल. मनातील इच्छा पूर्ण होणार.

धनू
अहो जरा थांबा की. गाडी जोरात चालवत आहात. एकापाठोपाठ एक यशाचे स्टेशन आपण पार करीत आहात. सगळे जण आपले कौतूक बघून आश्चर्यचकित होत आहेत. ह्याला म्हणतात दैव. मकर आता आपले मनासारखे झाले ना मग चिंता कसली कारताय. आता थांबायचे नाही आता लढायचे. एकापाठोपाठ विजय मिळवायचा. लक्ष ठेवून कार्य करा. सर्वांचे सहकार्य मिळेल.

 कुंभ 
आता मागीलं पाने उलगडत बसू नका. आता खुप कामे करावयाची आहे. वेळ पुरणार नाही. नविन कामे मिळतील दुरवर प्रवास करावा लागेल. नाविन ओळखी होतील. नविन कामे कराल. आपले कार्य योग्य दिशेने वाटचाल करेल.

मीन 
दूरवर प्रवास करावा लागेलं. प्रवास आपण कराल लाभ इतर जण मिळवतील. इतरांचे शाब्दीक बोलाने आपण हरबरेचे झाडावर चढू नका. वैयक्तिक लाभा कडे लक्ष द्यावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

शुभाशुभ

२3  मार्च सांय१९पावेतो उतम
२४  मार्च अशुभ
२५  मार्च चांगला दिवस
२६  मार्च शुभ दिवस
२७  मार्च सांय१८नंतर शुभ
२८  मार्च चांगला दिवस
२९  मार्च दिवसा१५पावेतो शुभ
३०  मार्च अनिष्ट
३१  मार्च अशुभ

दिन विशेष 

23 मार्च संत एकनाथ महाराज षष्ठी
२५ मार्च कालाष्टमी
२८ मार्च .पाप मोचोनी एकादशी
२९ मार्च भौमप्रदोष्
३० मार्च शिवरात्री
३१ मार्च अमावस्या

सुरेशराव बोरकर गुरुजी
ब्रह्मांड ज्योतिष
रावेर [ जळगांन] 425508
9850015558 / 7038383849

Navi Mumbai: खारघर-बेलापूर कोस्टल रोडसाठी सिडकोकडून टेंडर; रहिवाशांचा तीव्र विरोध

Navratri 2024: माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु

Navratri 2024: जाणून घ्या नवरात्रीमध्ये लावण्यात येणाऱ्या अखंड ज्योतिमागे काय आहे कारण...

IND vs BAN: पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशचा केला 280 धावांनी पराभव; मालिका 1-0 ने जिंकली

Sanjay Raut On Sharad Pawar: शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत यांचं प्रत्युत्तर