हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा १ मार्च ते ७ मार्च या आठवड्यातील तुमचे भविष्य.
मेष
विद्यार्थी वर्गास अतिउत्तम सप्ताह आहे . स्पर्धा परीक्षा अथवा इतर कार्यात भाग घेतलेला असल्यास त्यात भरघोष यश प्राप्त मिळेल. अविवाहितांना उत्तम स्थळे प्राप्त होतील. इच्छा असल्यास शुभमंगल सावधानपण होईल. हा सप्ताह सुखदायी, यशदायक असणार आहे. वृध्द जणांचे तब्येतीची काळजी घ्यावी.
वृषभ
आपल्या मनातील इच्छा पुर्ण होणारा हा सप्ताह असणार आहे. ज्या कामांना आतापावेतो अडथळे येत होते ती सर्व अडथळे दूर होतील. नवीन शुभ वार्ता कानी पडेल. वाहन चालवतांना सावधानता बाळगावी.
मिथुन
हा सप्ताह आपणास प्रयत्न केल्यास यश मिळेल. ह्यामुळे आपण कर्तव्य करीत रहावे व यश मिळवित रहावे. कायदेविषयक कार्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागणार आहे. ह्यात प्रतिपक्ष वरचढ ठरण्याची संभावना आहे. पाण्यापासुन सावध रहावे. विद्यार्थी वर्गास उत्तम दिवस आहे.
कर्क
घरात मांगलीक कार्य ठरविले जाईल. प्रयत्न केल्यास अविवाहितांना उत्तम स्थळ प्राप्तीचे योग आहेत. घरात इतरजणांनाकडून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. जुने आजार डोकेवर काढतील. नको त्या ठिकाणी बदली होईल
सिंह
घरात मांगलीक कार्य ठरविले जाईल. ह्या निमित्त घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. विद्यार्थी वर्गास यश मिळेल. परंतु अपघाताचा धोका आहे. पाण्यापासून दूर रहावे. स्वतःच्या आरोग्य समस्या उद्भवणार आहेत. उष्णताजन्य विकाराची अधिक संभावना आहे.
कन्या
गर्भवती महिलांनी आपले प्रकृतीकडे लक्ष द्यावे घरात लहान मुले असतील तर त्यांची काळजी घ्यावी दूरवर प्रवास करू नये आवश्यक असलेस वाहन सर्विसिंग करूनच प्रवास करावा मुत्यवान वस्तुंची काळजी घ्यावी
तुळ
घरगुती संबधीत संपत्तीबाबत काही वाद असतील तर ही प्रकरणे कोर्ट दरबारी जातील. संतती इच्छुकांना मनाप्रमाणे संततीचा लाभ होईल. टेस्ट ट्यूब बेबी करण्यासाठी उत्तम सप्ताह आहे. मुलांसाठी वाहन खरेदी कराल.
वृश्चिक
संपुर्ण आठवडा चांगला आहे. आपण तर भाग्यवान आहात, परंतु आपणास सहकार्य करेल तो पण भाग्यवान ठरणार आहे. विद्यार्थी वर्गास उत्तम सप्ताह आहे. नोकरी इच्छुकांना नोकरीचा लाभ होईल. आनंददायक वार्ता मिळेल.
धनू
साडेसाती असताना लाभं शक्य आहे. भाग्य उदय होण्याची शक्यता असून मनातील इच्छा पुर्ण होतील. मुलांचे संबधीत कार्य मार्गी लागतील. विद्यार्थी वर्गास यश मिळवून देणारा सप्ताह आहे. शेतकरी वर्गास अती उत्तम सप्ताह राहील.
मकर
नवी दिशा नवे मार्ग मिळणार आहे. आपणास नवीन जग पहायला मिळेल. भावी आयुष्याचे बीज रोवण्यासाठी उत्तम सप्ताह आहे. थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील.
कुंभ
विश्वास ठेवण्यापुर्वी संबंधितांची परीक्षा घ्या. कसोटीवर त्यास कसून घ्या. नाहीतर विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आपलेच सहकारी मदत करतील. नातेवाईकांचे सहकार्य आपणास मनाप्रमाणे मिळेल. धावपळ मार्गी लागेल. गोड वार्ता मिळेल.
मीन
मनातील इच्छा पुर्ण होतील. विद्यार्थी वर्गास यश मिळेल. परंतु प्रवासात अडचणी येतील. लोभापासुन दूर रहा, नाहीतर फसगत होण्याची शक्यता आहे. मुलांची काळजी घ्यावी. धार्मिक कार्यात ऐनवेळी नातेवाईक मंडळी अडथळा करतील. पाण्यापासून धोका आहे. तब्येतीकडे लक्ष द्यावे.
कोणता दिवस कसा
१मार्च वर्ज्य दिवस
२मार्च अनिष्ट दिवस
३मार्च चांगला दिवस
४ मार्च शुभ दिवस
५ मार्च उत्तम दिवस
६ मार्च सकाळी ९पावेतो शुभ
७ मार्च चांगला दिवस
विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी
ब्रह्मांड ज्योतिष, रावेर [जळगाव ]
9850015558
7038383849