हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा 8 मार्च ते 15 मार्च या आठवड्यातील तुमचे भविष्य.
मेष
घरातील वृध्द जणांचे प्रकृती कडे लक्ष द्यावे लागेल. पितृकामासाठी
प्रवास करावा लागेल.पितृसंबधीत नातेवाईकांसी वादाची संभावना राहील. अविवाहितांना विवाह स्थळे येतील . ह्याबाबत गैरसमज करण्याचा प्रयत्न होईल. त्याकडे लक्ष न देता विवाह जमविण्याचा प्रयत्न करावा . स्वतःचे आरोग्याकडे लक्ष घावे. घरास कुलूप लावून बाहेर जावू नका. मुल्यवान वस्तुंची काळजी घ्यावी.
वृषभ
आजचा दिवस सामान्य जरी वाटत असला तरी आजचा दिवस आपणास खास ठरणार आहे . प्रथमत: आपले मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत . अविहातांचे पितृसंबधीत नातेवाईकाकडून विवाह जमणार आहेत . नोकरी ज्यांना हवी आहेत त्यांनी आज नोकरीसाठी प्रयत्न करावेत नोकरी लागण्याची शक्यता अधिक आहे . प्रयत्नांना यश मिळेल.
मिथुन
प्रारंभी मनाविरूध्द वातावरण जरी राहत असले तरी आपण उदास होवू नये . कालातराने आपले मनाप्रमाणे वातावर तयार होणार आहे . मनाप्रमाणे कार्य करावयास मिळणार आहे . कोर्टकचेरीचे कामात
अडथळे जरी आले तरी आपला विजय ठरलेला आहे . त्याचप्रमाणे आपण कार्य करावे. प्रवासात अडथळे येतील . प्रवास जपून करावा.
कर्क
मिश्चित स्वरूपाचा दिवस असेल परंतू अशुभ मूळीच नाही . काही विरोधात कार्य होत असले तरी हेच कार्य कालांतराने आपले मर्जीप्रमाणेच कार्य सिद्ध होणार आहेत . फारसी काळजी करणारा हा सप्ताह नाही . घरातील वातावरण अशांत होईल ह्याबाबत घरात शांतता कशी राहील ह्याबाबत काळजी घ्यावी. घरास कुलूप लावून बाहेरगावी जावू नका . नविन कार्य सुरू कराल.
सिंह
८o टक्के सप्ताह हा आपणास अनुकूल राहणार आहे .२० टक्के प्रतिकूल हवामानात आपणास कार्य करावे लागणार आहे . योजना आखुन कार्य केल्यास संपूर्ण सप्ताह हा सफलतेचा असणार आहे. विचारपूर्वक पावले टाकावीत.पाण्यापासुन सावध रहावे. घसरून पडण्याचा धोका आहे. वाहन सर्विसिंग करूनच प्रवास आरंभ करावा प्रवासात गाडीची सर्व कागदपत्र सोबत ठेवावी .पत्नी व्रतवैकल्यात मग्न राहील . ह्या निमित्त घरात वरदळ राहणार आहे
कन्या .
पत्नी आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थी वर्गास प्रस्तुत सप्ताह हा
अडथळेचा असणार आहे . कारण नसतांना आपणास शालेय कामासाठी धावपळ करावी लागणार आहे. संतती ज्या ठिकाणी कार्य करीत असेल त्या ठिकाणी अडथळे येतील ते आपणास वेळ काढून दूर करावे लागतील. नातेवाईकांना ह्या गडबडीत वेळ देता येणार नसल्यामुळे नातेवाईक मंडळी नाराज होतील. वडिलधारी मंडळींचे घरात आगमन होईल . नवीन कार्य सुरू कराल .
तुळ
सप्ताह प्रारंभी शारिरीक अस्वथता जाणवू लागेल . ह्या सोबत मानसिक टेंशन वाढविणाऱ्या वार्ता कानी येतील . ह्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत राहणार आहे मातृअनारोग्याची काळजी घ्यावी लागेल . कौटुंबिक
कार्यासाठी जवळपास प्रवास करावा लागेल. प्रवासात मुल्यवान वस्तुंची
काळजी घ्यावी लागेल .
वृश्चिक
सप्ताहाची सुरवात उत्तम प्रकासची असताना शारिरीक अस्वथता त्यासोबत असणार आहे . कामे अशी असतील की शारिरीक प्रकृतीकडे
दूर्लक्ष करून आपणास कामे करावी लागणार आहे . भाग्योदयाची पहाट आपणास बघावयास मिळणार आहे. शुभकार्य देखील आपले हातून सफल होणार आहे . मनाला आनंद वाटेल व शरिरात उत्साह निर्माण होईल अशी स्थिती पण राहणार आहे . आपण करीत असलेले कार्याची नोंद घेतली जाणार आहे . लाभ पण मिळवाल. आर्थिक कामास वेगवान गती मिळेल .
धनू
वा काय कृपा . साडेसाती असतांना श्री शनीदेवांची आपणावर कृपांची बरसात होणार आहे .एकापाठोपाठ यशाची पायरी आपण चढत जाणार आहे . भाग्य किती घ्यावे दोन हातांनी अशी स्थिती निर्माण होणार आहे .जे दूर झाले त्यांना पश्चाताप होईल . अनेक नवीन मंडळीच्या भेटीगाठी होतील . आनंदमय सप्ताह असेल.
मकर
विचार करू नका .विचारात वेळ घालवू नका .थांबू नका चला धावा
आपणास भाग्याची शर्यत जिंकायची आहे . ग्रहांची साथ आहे विजय आपला आहे. विजयासाठी आपली पण ग्रहांना साथ हवी आहे .पळा पळा पुढे पळा .भाग्याचा अरुणोदय बघा. आपली स्वप्न साकार करा . स्वामी श्री .शनि आपलेच सोबत राहाणार आहे . मग चिंता कशाला.
कुंभ
आपण काळजी कशाला करताय, आपले स्वामी श्री शनिमहाराज
आपले पाठीसी आहेत . मग विचार सोडा कार्य करीत रहा . यश आपलेच
आहें . आनंद आनंद चहुकडे . जिकडे तिकडे शुभ शुभ . जरा सावधपण रहा नजर लागले सारखे पण होणार आहे . शारिरीक अस्वथता निर्माण होईल घाईगर्दीत चुका होतील. मनस्थिर ठेवून कार्य करावे.
मीन
जसा जमाखर्चात जमा . नावे ह्या दोन बाजू असतात . त्याचप्रमाणे जीवनातील आयुष्य जमाखर्चात योग्य व अयोग्य-चुक की बरोबर
ह्या दोन बाजू असतात .आपलेच खरे असे समजून अधिक चूका होत असतात . हे लक्षात घ्यावे . साडेसाती येत आहे सावध असावे कौटूंबीक
वातावरण खेळीमेळीचे राहील. संतती त्यांचे कार्यात उत्तम यश मिळवतील . पैसा हाती भरपूर राहील.
साप्ताहिक पंचाग >>>>>>>>>>>>>>
दिनांक ८ मार्च > घबाड योग
दिनांक ९मार्च > भद्रा रात्री २६-५७नंतर
दिनांक १० मार्च >श्री . दुर्गा अष्टमी पूजन . भद्रा दिवसा१६-१५पावतो
दिनांक १२ मार्च दग्ध सकाळी ८-०८पावतो
दिनांक १३ मार्च > भद्रा रात्री २३-१८नंतर
एकादशीचे श्राद्ध आज करावेत
दिनांक १४ मार्च > श्री . आमलकी एकादशी
दिनांक १५ मार्च >भौम प्रदोष .
त्रयोदशीचे श्राद्ध आज करावेत
साप्ताहिक शुभाशुभ
दिनांक ८ मार्च > अनिष्ट दिवस
दिनांक ९ मार्च > सकाळी ९नंतर उत्तम दिवस
दिनांक १० मार्च > दिवसा१६नंतर शुभ
दिनांक ११ मार्च >सामान्य दिवस
दिनांक १२ मार्च > चांगला दिवस
दिनांक १ ३मार्च > चांगला दिवस
दिनांक १४ मार्च > दिवसा१२नंतर चांगला दिवस
दिनांक १प मार्च > चांगलादिवस
>>>>विशेष जपासना >>>>
दिनांक १५ मार्चला भौम प्रदोष आहे
ज्या मुलामुलींचे विवाहास विलंब होत आहे . अशा मुलामुलींनी सायंकाळी
१८ -४७ वाजेचे नंतर व२०-०७चे आंत ज्या मंदीरातील श्री गणपतीस शेंदूर लावलेला आहे, अशा मंदीरात जावे नारंगी संत्रा कलर वस्त्रात एक नारळ व आपले जन्म राशि संख्येइतके नाणी त्यात ठेवावी व हे नारळ गणपतीस अर्पण करावे . दुसरे नारळ ह्याच रंगाचे वस्त्रात बांधून हे पण नारळ सोबत मंदीरात न्यावे . नाणी असलेले देवास गणपतीत अर्पण करावे व दुसरे घरी आणावे व ७७ दिवशी पूजन करावे .७८वे दिवसी पाण्यात विर्सजन करावे
आपले अनुभव लिखीत स्वरूपात पोष्टाने कळवावे़
विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी
ब्रह्मांड ज्योतिष
रावेर ( जळगाव )
९८५००१५५५८
७०३८३८३८४९