आज श्रावण महिन्यातील चौथा म्हणजेच शेवटचा सोमवार. श्रावण सोमवारचे व्रत केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होताता अशी म्हटले जाते. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि पूजा करतात. यावर्षी अधिक मास असल्याने अधिक श्रावण आणि निज श्रावण मिळून 59 दिवसाचा श्रावण महिना झाला.
श्रावण महिना 15 सप्टेंबर रोजी संपणार आहे.महादेवाच्या उपासनेसाठी श्रावण महिना सर्वोत्तम काळ मानला जातो. त्यामुळेच महादेवाचे भक्त वर्षभर या पवित्र महिन्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. भगवान शंकराची पूजा करण्यासाठी श्रावणी सोमवार व्रताला श्रावणात खूप महत्त्व आहे. याच व्रताचा आजचा चौथा आणि शेवटचा सोमवार आहे .
शुभमुहूर्तावर शिवलिंगाची पूजा करा. शिव चालिसा आणि सोमवार व्रत कथेचे पठन करा. शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करा. पांढरी फुले, बेलपत्र अर्पण करा. फळांचा नैवेद्य दाखवावा. शंकराची आरती करावी. तसेच ॐ नमः शिवाय। हा मंत्र म्हणावा.
वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोकशाही मराठी कोणताही दावा करत नाही.