अध्यात्म-भविष्य

संकष्टी चतुर्थी 2023: भाद्रपद महिन्याची संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धती

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी चतुर्थी हेरंब संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. यावेळी भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी रविवार, ३ सप्टेंबर रोजी आहे. या दिवसाला बहुला चौथ असेही म्हणतात.

Published by : Team Lokshahi

प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात. या महिन्यातील संकष्टी चतुर्थी उपवास 3 सप्टेंबरला केला जाणार. या दिवशी भक्ती भावाने श्री गणेशाची पूजा करुन उपवास केला जातो. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. तसेच गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी मनोभावे उपवास देखील करतात. दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री उपवास सोडला जातो. मात्र उपवास सोडण्यापूर्वी रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यावरच व्रत मोडते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री 9:18 वाजता चंद्र दिसणार आहे.

संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत

• घरातील मंदिरात दिवा लावावा.

• शक्य असल्यास या दिवशीही उपवास ठेवा.

• गणपतीला गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा.

• गणपतीला फुले अर्पण करा.

• तसेच गणेशाला दुर्वा अर्पण करा.

संकष्टी चतुर्थीचे महत्व

संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या पुण्यकारक प्रभावामुळे जीवनातून नकारात्मकता दूर होते. जीवनात सुख-शांती येते. विघ्नहर्ता जीवनातील सर्व समस्या सोडवतो असे मानले जाते. यासोबतच श्रीगणेश आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. चतुर्थी तिथीला चंद्रदर्शनालाही विशेष महत्त्व आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result