Mokshada Ekadashi 2023 : दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. मोक्षदा एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्री हरींना प्रसन्न करण्यासाठी उपवास केला जातो. असे म्हणतात की मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश केला होता, म्हणून या दिवशी उपवास करून भगवान श्री हरी आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात आणि त्यांचे सर्व संकट दूर करतात. जाणून घ्या शुभ मुहुर्त आणि पूजन विधी....
मोक्षदा एकादशी कधी साजरी होणार?
कॅलेंडरनुसार, मोक्षदा एकादशीची तारीख 22 डिसेंबर रोजी सकाळी 8:16 पासून सुरू होईल, 23 डिसेंबर रोजी सकाळी 7:11 पर्यंत राहील. व्रत पाळण्याचा दिवस 22 डिसेंबर असेल, तर वैष्णव पंथाचे लोक 23 डिसेंबरला हे व्रत पाळतील. 24 डिसेंबरला सूर्योदयापूर्वी द्वादश तिथी समाप्त होईल.
मोक्षदा एकादशीची पूजा पद्धत
मोक्षदा एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे व उपवासाची शपथ घ्यावी. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते, असे मानले जाते. या दिवशी एका पाटावर पिवळे वस्त्र पसरून भगवान विष्णू आणि कृष्णाची प्रतिष्ठापना करा. तसेच, लाल किंवा पिवळ्या कापडात गुंडाळलेली गीतेची प्रत बसवावी. आता फळे, मिठाई आणि पंचामृत अर्पण करा आणि श्रीकृष्णाच्या मंत्रांचा जप करा. शेवटी तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा.