नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळते. 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र सुरु होणार असून सोमवार, 23 ऑक्टोबर हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असणार आहे.
नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. देवीची नऊ रूपे नऊ रंगांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक रंगाचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांचे कपडे देखील परिधान केले जातात.
पहिला दिवस- नारंगी
नारंगी रंग उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे.
दुसरा दिवस- पांढरा
पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. मन प्रसन्न राहते.
तिसरा दिवस- लाल
लाल रंग शक्ती, उत्साह आणि उर्जेचे प्रतीक आहे.
चौथा दिवस- निळा
निळा रंग आत्मविश्वास प्रतीक आहे.
पाचवा दिवस- पिवळा
पिवळा रंग आनंद प्रतीक आहे.
सहावा दिवस- हिरवा
हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक आहे. देवीला हा रंग खूप आवडतो.
सातवा दिवस- राखाडी
राखाडी रंग हा संयमचे प्रतीक आहे.
आठवा दिवस-जांभळा
हा जांभळा रंग महत्वकांक्षेचे प्रतिक आहे.
नववा दिवस- मोरपिसी
हा रंग अत्यंत शुभ मानला जातो.