Kartik Amavasya 2023 : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या 12 डिसेंबर रोजी आहे. 2023 सालची ही शेवटची अमावस्या आहे. या अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या अमावस्येला स्नान, दान आणि पूजा केल्याने विशेष लाभ होतो. अमावस्येच्या दिवशी भगवान हनुमान आणि मंगळ ग्रहाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी विधिवत पूजनासह काही उपाय केल्याने मंगळदोषासह पितृदोष नाहीसा होतो. जाणून घेऊया कार्तिक अमावस्येला केल्या जाणाऱ्या काही उपायांविषयी.
कार्तिक अमावस्या शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 12 डिसेंबरला रोजी सकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी प्रारंभ होईल. तर 13 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजून 01 मिनिटांनी समाप्त होईल. त्यानुसार अमावस्या तिथी 12 डिसेंबर 2023 रोजी आहे.
कार्तिक अमावस्येचे महत्व
या दिवशी पूजा, दान आणि पवित्र नदीत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. मंगळवारी अमावस्येचे व्रत केल्याने तुम्हाला केवळ हनुमानजीच नव्हे तर सूर्य, अग्नि, इंद्र, रुद्र, अष्टवसू, पूर्वज, अश्विनीकुमार आणि ऋषींची कृपा प्राप्त होते. मंगळवारी अमावस्या आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या दिवशी मंगळाची विशेष पूजा केल्याने कुंडलीतील मंगळाशी संबंधित अशुभ योगांचा प्रभाव कमी होऊ शकतो. ज्या लोकांच्या कुंडलीत मांगिलक योग आहे त्यांनी या दिवशी मंगळाची पूजा करावी.
तसेच, ज्या घराला पितृदोष असतो, त्यांनी मुक्ती मिळवण्यासाठी कार्तिक अमावस्येच्या दिवशी त्रिपिंडी श्राद्ध करावे. असे केल्याने तीन पिढ्यांचे पितर तृप्त होतात. यामुळे घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते.