Horoscope राशीभविष्य Team Lokshahi
अध्यात्म-भविष्य

Horoscope राशीभविष्य |'या' राशीच्या लोकांसाठी कसा असणार आठवड्याचा पहिला दिवस? वाचा कसा तुमचा दिवस

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा आजचे तुमचे राशी भविष्य.

Published by : Team Lokshahi

मेष (Aries Horoscope)

मेष राशी जातकांना नवीन व्यवसाय कलाक्षेत्र इत्यादी गोष्टीसाठी हा सप्ताह चांगली संधी निर्माण करेल. कौटुंबिक लोकांमार्फत पाठबळ मिळेल. आनंदी वार्ता कानावर पडतील. प्रकृती संबंधित थोडे त्रास उद्भवतील. कामाचा आराखडा ठरवून केलेली कामे यशस्वी राहतील. विद्यार्थी मित्रांना कष्टाचे फलित आनंददायी ठरेल.

वृषभ (Taurus Horoscope)

वृषभ राशी जातकांना नवनवीन घटना घडून येतील. अचानक जबाबदाऱ्या अंगावर पडतील. हितचिंतकांमार्फत घेतलेले निर्णय फायद्याचे राहतील. नवीन गोष्टीचा उपभोग घेता येईल प्रवास घडून येतील. स्वास्थसंबंधी थोडीशी काळजी त्रास देईल. कलागुणांना चांगल्याप्रकारे वाव मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope)

मिथुन राशी जातकांना रवी स्वतःच्या उच्च राशी जाणार असल्यामुळे अधिकार प्राप्ती मिळेल. अधिकारी लोकांच्या उच्चशिक्षित लोकांच्या गाठी घडून येतील. नवनवीन लोकांसोबत ओळख निर्माण होईल. मदतीचा हात विचार करून गांभीर्याने केलेली मदत फायद्याची ठरेल तडकाफडकी घेतलेले निर्णय अडचणी निर्माण करू शकतात.

कर्क (Cancer Horoscope)

कर्क राशी जातकांना हा सप्ताह आर्थिक स्वरूपाचा असेल. आवश्यक तिथे खर्च करावा वाहनापासून धोका निर्माण होऊ शकेल. गडबडीमुळे जलदगती परिणामी घातक ठरू शकेल. निर्णय घेताना वरिष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल.

सिंह (Leo Horoscope)

सिंह राशी जातकांना हा सप्ताह उत्साहवर्धक ठरेल आनंदी व समाधानी राहून मानसिक स्थिती विचारांमध्ये काहीतरी नवीन कार्याची संधी निर्माण करू शकेल प्रवास घडतील. संपर्कातून अनेक मित्र-मैत्रिणी ओळखी होतील. प्रसन्नता जाणवेल.

कन्या (Virgo Horoscope)

कन्या राशी जातकांना हा सप्ताह मनस्वी आनंद देणारा ठरेल. नोकरदारांना आर्थिक दृष्टीने समाधानकारक सप्ताह असेल अधिकार प्राप्ती मिळेल. स्थावर अडकलेली कामे या दिवसांमध्ये पूर्ण होतील. वरिष्ठामार्फत समाधानकारक घटना घडून येतील. प्रवास घडून येतील जोडीदाराची साथ मिळेल

तुळ (Libra Horoscope)

तुळ राशी जातकांना हा सप्ताह धार्मिक प्रवास घडवून आणेल. चांगल्या संधी निर्माण होतील. त्याचा फायदा करून घ्यावा. सर्वांना सोबत घेऊन निर्णय किंवा काम केले तर त्याचे फलित स्वरूप खूप आनंदी असेल. तामसीपणा, चिडचिडेपणा आवर घालावा. या गोष्टीमुळे मानसिकतेवर व शरिरावर अचानक परिणाम दिसून येईल. संयम ठेवणे फायद्याचे राहील.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशी जातकांना अत्यंत समाधानी व प्रसन्नता निर्माण करणारा हा सप्ताह असेल. गुरुकृपा गुरुनिष्ठा गुरुतुल्य व्यक्तीमार्फत फायदा घडून येईल. पाण्याच्या ठिकाणी अधिक प्रवास घडून जास्त वास्तव्य राहील. सर्व नकारात्मक विचार आपोआप दूर होऊन चांगल्या घटना या सप्ताहात घडून येतील.

धनु (Sagittarius Horoscope)

धनु राशी जातकांना हा सप्ताह निर्णय समोर घेताना भीतीदायक प्रसंग निर्माण होतील. परंतु घेतलेले निर्णय धोक्याची आहे. असे नाही निर्णय फायदा निर्माण करून देतील कागदोपत्री व्यवहार स्वाक्षरी वाचल्याशिवाय कुठेही करू नये. लोक संधीचा फायदा करून घेतील व तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतात या गोष्टी काळजीपूर्वक तपासा.

मकर (Capricorn Horoscope)

मकर राशी जातकांना आरोग्य कसे व्यवस्थित राहील याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल. अस्थि संबंधी, पाया संबंधी, गुडघ्या संबंधी तक्रारी निर्माण होतील. वाहनापासून धोका निर्माण होईल. महत्त्वाचे प्रॉपर्टी बद्दल वैचारिक स्थिती संकोच निर्माण करेल. परंतु, निर्णयाला स्थगिती खूप महत्त्वाची असेल.

कुंभ (Aquarius Horoscope)

कुंभ राशी जातकांना समतोल प्रमाणामध्ये हा सप्ताह असेल प्रसंगी बोलण्यातून वाद-विवाद या घटना घडून येतील. कामाचा उरक चांगल्या प्रकारे रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रवास घडून येतील. कौटुंबिक खर्च निर्माण होतील. परंतु, शांती संयम या गोष्टीची जाणीव निश्चित महत्त्वाची ठरेल. पैशासंबंधी जागेसंबंधी व्यवहार शक्यतो टाळावे.

मीन (Pisces Horoscope)

मीन राशी जातकांना हा सप्ताह कोणावरही अंधविश्वास न ठेवता खात्री करून घेतलेले निर्णय फायद्याचे राहतील. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करावी. विरोधकांमार्फत त्रासिक घटना घडवून येतील. वाद-विवाद टाळावा गृहसौख्य चांगले लाभेल आप्तेष्टांच्या भेटी घडून येतील.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी