अध्यात्म-भविष्य

Daily Horoscope 27 September Rashi Bhavishya : वृषभ राशीला शेअर बाजारात नुकसान; पाहा तुमचे भविष्य

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मेष (Aries Horoscope Today) : आपले मत मांडण्यास कचरु नका. पैश्याची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. नव्या संकल्पना फलप्रद.

वृषभ (Taurus Horoscope Today) : शेअर बाजारात नुकसान संभवते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. परदेशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य.

मिथुन (Gemini Horoscope Today) : तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आर्थिक लाभ. काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल.

कर्क (Cancer Horoscope Today) : आर्थिक लाभ होईल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला. वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल. प्रवासाची शक्यता.

सिंह (Leo Horoscope Today) : खर्चांवर नियंत्रण ठेवा. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. तुमचे वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल.

कन्या (Virgo Horoscope Today) : कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. खर्चांवर नियंत्रण ठेवा. तुमचे ग्रहतारे आज तुम्हाला अतिरिक्त ताकद प्राप्त करून देतील. वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणे गरजेचे आहे.

तूळ (Libra Horoscope Today) : गुंतवणुकीतून फायदा. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही जोडीदारासोबत वेळ घालवू शकतात.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : आर्थिक व्यवहारात सांभाळा. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य. जोडीदारासोबत अद्भूत क्षण घालवाल.

धनु (Sagittarius Horoscope Today) : आर्थिक लाभ संभवतो. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास साहाय्य आणि प्रेम देतील. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज. वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव.

मकर (Capricorn Horoscope Today) : आर्थिकमध्ये सामान्य परिस्थिती. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. जोडीदारासोबत खूप धमाल करणार आहात.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : खर्चांवर नियंत्रण ठेवा.कामावर लक्ष केंद्रीत केले तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल.

मीन (Pisces Horoscope Today) : आर्थिक समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी ज्येष्ठ मदतीला धावून येतील. जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळेल, संयम सोडू नका. प्रवासाचा बेत आखाल.

Black circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी