अध्यात्म-भविष्य

Daily Horoscope 23 November Rashi Bhavishya : 'या' राशीला येईल खऱ्या प्रेमाची प्रचिती; पाहा तुमचे भविष्य

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मेष (Aries Horoscope Today) : धन लाभ होण्याची शक्यता. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम. रोमान्ससाठी चांगला दिवस. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस.

वृषभ (Taurus Horoscope Today) : आर्थिक लाभ होऊ शकतो. मित्रांच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईझ देऊ शकतात.

मिथुन (Gemini Horoscope Today) : रागावर नियंत्रण मिळवा. धन लाभ होऊ शकतो. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता. तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे, कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

कर्क (Cancer Horoscope Today) : धन लाभ होईल. परदेशातील व्यापारांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता. या सोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकतात. जोडीदारांकडून आज सरप्राइझ मिळेल.

सिंह (Leo Horoscope Today) : आर्थिक स्थिती सुधारेल. उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. वैवाहिक आयुष्यात खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.

कन्या (Virgo Horoscope Today) : खर्चावर नियंत्रण ठेवा. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल - परंतु, तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता. जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात.

तूळ (Libra Horoscope Today) : खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. प्रयत्नांमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईझ देऊ शकतात.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : विचार करुनच गुंतवणूक करा. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल.

धनु (Sagittarius Horoscope Today) : गुंतवणूक करणे गरजेचे. परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.

मकर (Capricorn Horoscope Today) : आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : आर्थिक चिंता ग्रासेल. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबतच्या गप्पांचे पर्यवसान भांडणात होईल.

मीन (Pisces Horoscope Today) : धन धार्मिक कार्यात लावू शकता. जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. आज कुठल्या सहकर्मी सोबत तुम्ही संद्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकतात.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result