अध्यात्म-भविष्य

गणेश विसर्जनाच्या वेळी 'या' गोष्टी ठेवा लक्षात; बाप्पांचा राहील आशीर्वाद

गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला गणेश उत्सव आता उद्या अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर संपणार आहे. गणेश विसर्जन दरम्यान काही गोष्टींची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Ganesh Visarjan 2023 : गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला गणेश उत्सव आता उद्या अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर संपणार आहे. गुरुवार, २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचा सण साजरा केला जाणार असून याच तारखेला गणेश विसर्जन केले जाते. सर्व विघ्न दूर करणारा गणेश प्रत्येक घरात असतो. काही लोक गणेश चतुर्थीच्या तिसर्‍या, पाचव्या आणि सातव्या दिवशी गणेश विसर्जन करतात, तर काही जण 10 दिवस पूर्ण झाल्यानंतरच शुभाची प्रार्थना करतात. गणेश विसर्जन दरम्यान काही गोष्टींची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर बाप्पा तुम्हाला वर्षभर आशीर्वाद देईल. चला जाणून घेऊया

गणेशाची अशी करा पूजा

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या आधी श्रीगणेशाची यथासांग पूजा करावी. जास्वंदीचे फुल, हार, दुर्वा, फळे, धूप, मोदक अर्पण करावे आणि गणेश चालिसाचे पठण करावे. यानंतर जवळ ठेवलेल्या सर्व वस्तूंचा एक पोटली बनवून गणेशाजवळ ठेवा. आरतीनंतर 10 दिवस पूजेदरम्यान अनावधानाने झालेल्या चुकीची गणेशांकडून क्षमा मागून मंगलकामनाची प्रार्थना करा. मग गणपती बाप्पा मोरयाचा जयजयकार करत घरातून निरोप देतात.

घरातून बाहेर पडताना हे लक्षात ठेवा

घरातून बाहेर पडताना बाप्पाला घरभर घेऊन जा आणि घराच्या दारातून बाहेर पडताना बाप्पाचे तोंड घराकडे आणि पाठ बाहेरच्या दिशेने ठेवा. यानंतर विसर्जनाच्या ठिकाणी न्या. विसर्जनाच्या ठिकाणी नेताना गणपतीची मुर्ती ज्यांच्या हातात असेल त्यांनी मागे पाहू नये.

बाप्पाला विसर्जनस्थळी नेल्यानंतर पुन्हा एकदा कापूरची आरती करावी आणि सर्वांना प्रसाद द्या. तर सर्वांनी गणेशजींचे आदरपूर्वक विसर्जन करावे. तसेच माफी मागून पुढच्या वर्षी लवकर यावे ही विनंती करावी.

असे करा विसर्जन घरीच

जर तुम्ही घरी प्लॅस्टिकच्या टबमध्ये किंवा भांड्यात गणेश विसर्जन करत असाल तर संपूर्ण प्रक्रियेचे पालन करा. त्यानंतर विसर्जन करून ते पाणी आणि माती घराच्या कुंडीत किंवा बागेत विसर्जित करा. यानंतर श्रीगणेशाचे लवकर येवून सर्व संकटे दूर होण्यासाठी प्रार्थना करा.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय