दहीहंडी हा सण राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. आज मानाच्या हंड्या फोडण्याचा मान कोणतं मंडळ जास्त पटकावणार, सर्वात जास्त मानवी थर लावण्याचा मान कोणत्या मंडळाला जाणार, अशा अनेक गोष्टींसाठी आज गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. या सगळ्या गोष्टींकडे आज सगळ्यांचे लक्ष लागणार आहे.
जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. श्रीकृष्णाला दही आणि लोणी खाण्याची खूप आवड होती. भगवान श्रीकृष्ण ज्याप्रकारे गोकुळात शेजाऱ्यांच्या घरातून दही, दूध आणि लोण्याचे भांडे फोडत असत. त्यामुळे ते गोपींची भांडी फोडून दही आणि लोणी चोरुन खात होते. लोणी आणि दही वाचवण्यासाठी गोकुळमधील लोकांनी दही आणि लोण्याने भरलेली भांडी उंचावर टांगायला सुरुवात केली. मात्र श्रीकृष्ण हे मित्रांसह मनोरे रचून ही भांडी फोडून लोणी आणि दही खायचे. श्रीकृष्णाच्या बालपणीच्या खोडकरपणाची आठवण म्हणून साजरी केली जाते.
ही माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. लोकशाही मराठी या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावं