अध्यात्म-भविष्य

वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी; 'या' उपायांनी मनोकामना होतील पूर्ण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Sankashti Chaturthi 2023 : संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला अखुरथ संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाची पूजा केली जाते. सर्व देवी-देवतांमध्ये पूजल्या जाणार्‍या गणपतीला पहिले मानले जाते. त्याला बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि बुद्धीची देवता म्हटले जाते. वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी ३० डिसेंबर रोजी आहे. संकष्टी चतुर्थीला पूर्ण विधीपूर्वक श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते.

अखुरथ संकष्टी चतुर्थी 2023 पूजेसाठी शुभ मुहूर्त

अखुरथ संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 09:43 वाजता सुरू होईल आणि 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11:55 वाजता समाप्त होईल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8.03 ते 9.30 पर्यंत आहे. संध्याकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त 6.14 ते 7.46 पर्यंत आहे.

संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत

या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करावी आणि स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावेत. या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी लाल वस्त्र परिधान करून पूजा करणे सफल मानले जाते. आंघोळीनंतर गणपतीची पूजा करावी. गणपतीची पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे हे लक्षात ठेवा. गणपतीची मूर्ती फुलांनी सजवा. तीळ, गूळ, लाडू, फुले, पाणी, उदबत्ती, चंदन, केळी आणि नारळ तांब्याच्या कलशात ठेवा.

गणपतीला रोळी लावा आणि त्याला फुलं आणि पाणी अर्पण करा. त्यांना तिळाचे लाडू आणि मोदक अर्पण करावेत. या दिवशी पूजेनंतर फळे, शेंगदाणे, खीर, दूध किंवा साबुदाणाशिवाय काहीही खाऊ नये. संध्याकाळी, चंद्र उगवण्यापूर्वी, गणपतीची पूजा करा आणि संकष्टी व्रत कथा पाठ करा. रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यावरच उपवास सोडावा. या दिवशी पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात.

संकष्टी चतुर्थीचे महत्व

मान्यतेनुसार, अखुरथ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि घरात शांतता कायम राहते. असे म्हटले जाते की श्रीगणेश घरातील सर्व संकटे दूर करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात. चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनही खूप शुभ मानले जाते. सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्रदर्शनानंतर पूर्ण झाले असे मानले जाते.

Navra Majha Navsacha 2: "नवरा माझा नवसाचा 2" पहिल्याच दिवशी बाप्पाने दिला कौल! पहिल्या दिवशी केली 'एवढी' कमाई

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड

CM Eknath Shinde: जुहू चौपाटी स्वच्छता मोहिमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Amit Thackeray : सिनेट निवडणूक स्थगितीवरून अमित ठाकरेंची टीका; पोस्ट करत म्हणाले...

Sanjay Raut : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; संजय राऊत म्हणाले...