अध्यात्म-भविष्य

अधिक महिन्यात करा फक्त 'या' 4 गोष्टी, लक्ष्मी-नारायणची तुमच्यावर सदैव राहिल कृपा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Adhik Mass : मंगळवार, 18 जुलैपासून अधिक महिना सुरू होत आहे आणि 16 ऑगस्ट रोजी संपेल. या वेळी श्रावण महिन्यात अधिक महिना आल्याने श्रावण महिना दोन महिन्यांचा असणार आहे आणि असा योगायोग 19 वर्षांनंतर घडतं आहे. अधिक महिन्यात भगवान पुरुषोत्तम म्हणजेच विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात याचे महत्त्व सांगताना काही खास गोष्टीही सांगण्यात आल्या आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, अधिक महिन्यात जर या पाच विशेष गोष्टी केल्या तर लक्ष्मी नारायणाची कृपा कायम राहते आणि घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.

या उपायाने राहिल श्रीहरीची कृपा

भगवान विष्णू हे अधिक महिन्याचे स्वामी आहेत. या महिन्यात दररोज भगवान विष्णूची पूजा करणे आणि हरिच्या नावाने हवन करणे उत्तम मानले जाते. अधिक महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. त्यामुळे दररोज भगवान विष्णूची पूजा करून हवन केल्याने लक्ष्मी नारायणाची कृपा राहते आणि कुटुंबातील सदस्यांचीही प्रगती होते.

या उपायाने होतो मोक्ष प्राप्त

पवित्र ग्रंथ राम चरित्र मानस, श्रीमद भागवत कथा अधिक महिन्यादरम्यान पाठ करणे मोक्षाचे दरवाजे उघडण्यास मदत करते. रोज सकाळ-संध्याकाळ राम चरित्र मानस आणि श्रीमद भागवत कथेचे पठण केल्याने सभोवताली सकारात्मक उर्जेचा संचार होतो आणि जीवनाला नवी दिशा मिळते. अधिक महिन्यात त्यांचे सतत पठण केल्याने हे ग्रंथ जाताना विजय संपादन करण्याची प्रेरणा देतात.

या उपायाने पूर्ण होतात मनोकामना

अधिक महिन्यात भगवान विष्णूची पूजा करण्याबरोबरच विष्णू सहस्त्रनामाचा जपही करावा. यासोबतच तुळशीला रोज पाण्यात दूध मिसळून अर्पण करावे. असे केल्याने घरामध्ये सौभाग्य आणि आनंद राहतो आणि तणाव दूर राहतो. अधिक महिन्यात रोज या गोष्टी केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

या उपायाने होते देवी लक्ष्मीची कृपा

अधिक महिन्यामध्ये स्नान आणि ध्यान केल्यानंतर तुळशीच्या मातीचा तिलक रोज लावावा. श्रीहरींना तुळशी अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करते. म्हणूनच असे केल्याने सुख-समृद्धी वाढते आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते. अधिक महिन्यात रोज तुळशीच्या मातीचा टिळक लावल्याने देवी लक्ष्मीची कृपाही राहते आणि धनप्राप्तीचा मार्ग तयार होतो.

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल

वंचितची विधानसभेची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश

Navra Majha Navsacha 2: "नवरा माझा नवसाचा 2" पहिल्याच दिवशी बाप्पाने दिला कौल! पहिल्या दिवशी केली 'एवढी' कमाई