इतर

बिल गेट्स यांना टाकले मागे; गौतम अदानी ठरले जगातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती

Published by : Siddhi Naringrekar

बिल गेट्स यांना टाकत गौतम अदानी ठरले जगातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती. ६० वर्षीय बिझनेस टायकूनची संपत्ती गुरुवारी ११५.५ अब्ज डॉलरवर पोहोचली आणि गेट्स यांची संपत्ती १०४.६अब्ज डॉलर्स नोंद झाली आहे. या यादीत मुकेश अंबानी ९० अब्ज डॉलरच्या संपत्तीसह १० व्या क्रमांकावर आहेत. टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क २३५.८ अब्ज डॉलर्ससह या यादीत अव्वल स्थानावर आहेत.

फोर्ब्स’ने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली. टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे संस्थापक एलोन मस्क हे या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३४.४ अब्ज डॉलर आहे. बर्नाड अ‍ॅर्नो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईस व्हुताँ हे १५५.७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या तर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बझ हे १४९.९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

४ एप्रिल रोजी गौतम अदानी यांनी १०० अब्ज डॉलरचा टप्पा गाठल्याने ती जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले होते. तीन महिन्यांत त्यांच्या संपत्तीत १५ अब्ज डॉलरची भर पडली. “अवघ्या तीन वर्षात, अदानीने सात विमानतळांवर आणि भारताच्या जवळपास एक चतुर्थांश हवाई वाहतुकीवर नियंत्रण मिळवले आहे.

चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी मुकेश अंबानीना मागे सोडले. अंबानी या यादीत १० व्या क्रमांकावर घसरले आहेत. बिल गेट्स यांची संपत्ती १०४.२ अब्ज डॉलर असून त्यांच्यापेक्षा अदानी यांची संपत्ती ११ अब्ज डॉलरने अधिक आहे. अदानी यांनी गुरुवारी सांगितले की समूहाने गॅडोटच्या भागीदारीत इस्रायलमधील बंदराच्या खाजगीकरणासाठी निविदा जिंकली आहे. हैफा बंदर हे इस्रायलच्या तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय बंदरांपैकी सर्वात मोठे बंदर आहे.

Baramati | Supriya Sule | बॅनरवर सुप्रिया सुळेंचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख | Marathi News

Ramdas Athawale | 'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक'; रामदास आठवलेंची मागणी

Narayan Rane | शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंसाठी लोकसभेत खर्च? ; नारायण राणेंवर गंभीर आरोप

shirdi saibabatemple | शिर्डीत साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सुवर्णमुकुट अर्पण | Marathi News

Solapur | भर पावसात मराठा आंदोलकांनी अडवला अजित पवारांचा ताफा, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी