इतर

Gaganyaan Mission : 2023 मध्ये गगनयान अंतराळात जाणार; भारताची पहिली मानवी मोहीम

2023 मध्ये गगनयान अंतराळात जाणार आहे. ही भारताची पहिली मानवी मोहीम असणार असून भारतीय अंतराळ संस्था इस्रोने(Indian Space Agency ISRO) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी गगनयानची (Gaganyaan Mission) तयारी केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

2023 मध्ये गगनयान अंतराळात जाणार आहे. ही भारताची पहिली मानवी मोहीम असणार असून भारतीय अंतराळ संस्था इस्रोने(Indian Space Agency ISRO) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी गगनयानची (Gaganyaan Mission) तयारी केली आहे. आझादीच्या अमृत महोत्सवांतर्गत, इस्रोने शाळकरी मुले आणि सामान्य लोकांसाठी गगनयानशी संबंधित एका एक्सपोचे आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये लोकांना यासंबंधी माहिती दिली जाईल. माहितीनुसार, HLVM3 हे मिशन त्याच्यासोबत उड्डाण करेल. HLVM3 हे GSLVMk3 सारखेच आहे परंतु यामध्ये आपत्कालीन क्रू एस्केप सिस्टम आहे. त्यामुळे त्याला GSLV मार्क 3 ऐवजी HLVM 3 असे नाव देण्यात आले आहे.

भारत आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेत अंतराळवीरही पाठवणार आहे, 3 दिवस अंतराळात पाठवले जाईल. जे सुमारे 400 किमी उंचीवर कक्षेत राहील. हे मिशन 3 दिवस अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतणार आहे. भारताच्या समुद्रातून खाली उतरल्यानंतर ते पुनर्प्राप्त केले जाईल. या मोहिमेसाठी वेगवेगळ्या चाचण्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट, टेस्ट व्हेईकल मिशन्स, पॅड अॅबॉर्ट टेस्ट, मानवरहित उड्डाण या सगळ्यानंतर अखेर भारताची मानवयुक्त मोहीम अवकाशात पाठवण्यात येणार आहे.

2023 मध्ये गगनयानच्या प्रत्यक्ष उड्डाण करण्यापूर्वी तीन चाचणी मोहिमा देखील केल्या जाणार आहेत. त्यावेळी भारताकडून एक ह्युमनॉइड रोबोट पाठवला जाईल. त्यामुळेच इस्रोने 'व्योमित्र' नावाचा महिला रोबोट तयार केला असून तो संशोधनानंतर अवकाशात पाठवला जाणार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी