दिवाळी झाली की कार्तिकी एकादशीसाठी तयारी सुरू होते. यादिवशी तुळशी विवाह देखील साजरा होतो. तसेच यादिवशी काही शहरात श्रीरामाचा रथ काढण्याची परंपरा आहे. यंदा मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. कार्तिकी एकादशी निमित्त आपल्या प्रियजणांना द्या या शुभेच्छा.
सावळे सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयी माझे ।।
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !!
माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे रूप ओठी तुझे रूप ध्यानी
जीवाला तुझी आस का लागली
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी|
कर कटावरी ठेवोनियां||
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल|
करावा विठ्ठल जीवभाव||
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!