दिवाळी पाडव्याला सुरुवात झालेली आहे. दिवाळीचा पहिला सण हा वसुबारस आणि दुसरा सण हा धनत्रयोदशी असला तरी नरक चतुर्दशीला दिवाळीची पहिली आंघोळ केली जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान केले जाते. दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला हिंदू संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. केवळ दिवाळीला नव्हे तर अभ्यंगस्नान विविध प्रसंगी केले जाते. अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे.
अभ्यंग स्नान करण्यासाठी तुम्ही त्वचेची काळजी कशी घ्याल
अभ्यंग स्नान करत असताना तुम्ही बॉडी ऑइल, तिळाचे तेल, गुलाबपाणी, मॉइश्चरायझ वापरून शकता. त्याचसोबत उटने हे दुधात मिसळून अभ्यंग स्नान केल्याने तेलकटपणा कमी होईल तसेच यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. त्वचेची छिद्रे उघडण्यासाठी अभ्यंग स्नान करताना उटणे लावले जाते.