सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे प्रत्येकाला काही ना काही आजार जडला आहे खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित नसल्यामुळे तसेच शरीराला व्यायाम नसल्यामुळे विविध स्वरूपाच्या व्याधी आज लोकांना होत आहेत. त्यातच डायबिटीस हा आजार तरुणांपासून वृद्धांपर्यंत पसरला आहे. जर आपल्याला डायबिटीस होऊ द्यायचं नसेल तर आपण पुढील गोष्टींचा अवलंब केला पाहिजे.
आपल्याला डायबिटीस होऊ नये म्हणून पुढील पद्धतीचा आहार आपल्या जेवणामध्ये असला पाहिजे. भारतीय जेवणात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे. त्या आहारात प्रथिनांनाही जागा दिली पाहिजे. भाज्या- फळं अशा कच्च्या आहाराचं प्रमाण वाढवलं पाहिजे. साखर आणि गोड पदार्थ, चॉकलेट्सचं प्रमाण कमी केलं पाहिजे.कमी केलं पाहिजे.गोड पेयं, थंड पेयं, फळांचे रस, कॉन्सन्ट्रेटेड पेयांमुळे भरपूर साखर पोटात जाते. ते थांबवलं पाहिजे. योग्य प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे आणि वेळेवर पित राहिलं पाहिजे.
त्याचबरोबरीने व्यायामाला देखील आपल्या जीवनात महत्त्व आहे. नैमित्तिक स्वरूपाचा व्यायाम केल्यास आपण डायबिटीस पासून दूर राहू शकतो. प्रत्येक व्यक्तीने घरातील कामांच्या हालचालींशिवाय व्यायाम करण्याची गरज आहे असं डॉक्टर सांगतात.केवळ घरातल्या कामांवर विसंबून राहाता येणार नाही. चालणे, फिरणे, पोहणे, सायकलिंग, वेट ट्रेनिंगसारखे व्यायाम करण्याची गरज आहे. त्याला पर्याय नाही. महिलांनी व्यायामाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे हे सांगताना डॉ. असे सांगतात की, "ज्या महिलांना गरोदरपणाच्या काळामध्ये जेस्टेशनल डायबेटिस होतो त्यांनी प्रसुतीनंतर वजन कमी न केल्यास डायबेटिस कायम राहू शकतो किंवा पुढच्या प्रसुतीच्यावेळेस डायबेटिस निर्माण होऊ शकतो."यामुळेच महिलांनी वजन आटोक्यात आणून घरगुती कामांसह व्यायामासारख्या हालचाली केल्याच पाहिजेत असं ते म्हणतात.