India

Russia Ukraine War : ‘ऑपरेशन गंगा’चा वेग वाढला, भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी C17 विमान सज्ज

Published by : Shweta Chavan-Zagade

रशिया-युक्रेनमध्ये (Russia Ukraine Crisis) भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धाची सर्वाधिक झळ युक्रेनला पोहोचली आहे. युक्रेनमधील अनेक इमारती मिसाईल हल्ल्यात नेस्तनाबूत झाल्या आहेत. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी (indian student) अडकल्याने त्यांना मायदेशी आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' (Operation Ganga) आता अधिक तीव्र केले आहे.

भारतीयांना परत आणण्यासाठी पुढील 3 दिवस 26 फ्लाईट शेड्यूल केल्या आहेत. इतकेच नाही तर भारतीय हवाई दल ( Indian Air Force) देखील आता ऑपरेशन गंगामध्ये (Operation Ganga) सामील झाले आहे. यामुळे भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हवाई दल सज्ज झाले आहे. हवाई दलाचे C-17 एअरक्रॉफ्ट रोमानियात अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणणार आहे.

युक्रेनमधून 60 टक्के भारतीयांना बाहेर काढण्यात यश

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये (Ukraine) सुमारे 20,000 भारतीय अडकले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत 12000 भारतीयांनी युक्रेनमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या एकूण भारतीयांचे प्रमाण हे 60 टक्के इतके आहे. उर्वरित 40 टक्क्यांपैकी निम्मे खार्किवमध्ये अडकले आहेत. उर्वरित इतर नागरिक युक्रेनच्या संघर्ष क्षेत्राच्या बाहेर आहेत.

आता कीवमध्ये एकही भारतीय नाही
हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले की, आमच्या सर्व भारतीय नागरिकांनी कीव शहर सोडले आहे, आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार, कीवमध्ये एकही भारतीय नागरिक नाही, तिथून आमच्याशी कोणीही संपर्क साधला नाही.

सरकार 8 मार्चपर्यंत 46 विमानं पाठवणार
युक्रेनमधील खारकीव येथे रशियाच्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थी नवीनचा मृत्यू झाल्यानंतर भारताने 'ऑपरेशन गंगा' अधिक तीव्र केले आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारत 28 फेब्रुवारी ते 8 मार्च पर्यंत बुडापेस्ट, बुखारेस्ट आणि इतर ठिकाणी एकूण 46 विमान पाठवणार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी