अमेरिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटनं प्रशासनाची चिंता वाढवली आहे. याठिकाणी लसीचे दोन्ही डोस त्याचसोबत बूस्टर डोस घेतलेले लोक कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या विळख्यात सापडले आहेत. शुक्रवारी जारी केलेल्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत आतापर्यंत ४३ पेक्षा जास्त संक्रमित आढळले आहे. या रुग्णांचं पूर्ण लसीकरण झालेलं असतानाही त्यांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे. तर बूस्टर डोस घेतलेल्या प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण होत आहे.
अमेरिकेचं सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँन्ड प्रिवेंशन(CDC) ने म्हटलं आहे की, आतापर्यंत अमेरिकेत ४३ रुग्ण ओमायक्रॉनचे आढळले आहेत. यातील ३४ जणांचं पूर्ण लसीकरण झालेले आहे. तर १४ जणांनी बूस्टर डोसही घेतला होता. यातील ५ जण असे आहेत ज्यांनी १४ दिवसांच्या आधी लसीचा बूस्टर डोस घेतला होता. आकडेवारी पाहिली तर घाबरण्याचं कारण नाही. परंतु सध्या उपलब्ध असणाऱ्या कोविड लसी नव्या आणि जास्त संक्रमित करणाऱ्या ओमायक्रॉनविरुद्ध कमी सुरक्षा देत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.