कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. यातच आता ओमायक्राॅनचा शिरकाव झाला आहे. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या प्रकाराचा संसर्ग विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना झाल्याची भीती असल्याने डे प्रमुख तीन विमान कंपन्यांनी अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे नाताळाच्या सुट्टींच्या काळात प्रवाशांची गैरसोय होत आहे.
जर्मनीताल लुफ्तान्सा कंपनीने शुक्रवारी सांगितले की अनेक वैमानिक आजारपणाने रजेवर गेल्याने सध्या अटलांटिक महासागरापलीकडील लांब पल्ल्याची विमान सेवा रद्द करण्यात आली आहेत. अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध केले असले तरी ह्यूस्टन बोस्टन आणि वॉशिंग्टनची विमान उड्डाणे बंद ठेवावी लागली आहेत.
सुट्टीचा हंगाम असल्याने मोठ्या प्रमाणावर जादा कर्मचारी नियुक्त केले असले तरी अनेक जण आजारी असल्याचे कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. वैमानिकांच्या रजेमागे कोरोनाचा संसर्ग किंवा विलगीकरणाचे कारण आहे, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. कोणता आजार झाला हे त्यांनी स्पष्टपणे कळविले नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.