देशात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र समोर येत आहे. यात आता देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर असून आता घरातही मास्क लावण्याची वेळ आलीय, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
देशात ऑक्सिजनचा तुटवड्यावे केंद्र सरकार म्हणाले, ऑक्सिजन टँकर्समध्ये जीपीएस लावण्यात आले आहेत. या टँकर्सची सरकार मॉनिटरींग करत आहे. शक्य तितक्या लवकर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
मासिक पाळीतही लस घ्या
महिलांनी मासिक पाळीत लस घेऊ नये, त्यामुळे रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. अशा आशयाचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरही केंद्राने स्पष्टीकरण दिलं आहे. मासिक पाळीतही महिला इंजेक्शन घेऊ शकतात. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.