अकोले तालुक्यातील निंब्रळ येथील प्रवरा नदी पात्रात वाळू तस्करांनी अवैध्य रित्या कोट्यवधी रुपयांची शासनाच्या गौण खनिज वाळूची चोरी करून सरकारचा मोठा महसूल बुडविला होता. याची तक्रार ऐप्रिल २०१० मध्ये स्थानिक ग्रामस्थांनी केली होती व आता थेट ११ वर्षांनंतर यांची चौकशी प्रांतअधिकारी डॉ शषिकांत मंगळुरे यांनी सुरू केली आहे. यामुळे वाळु तस्करांचे धाबे तब्बल ११ वर्षनंतर दनानले आहे.
अकोले तालुक्यातील निब्रळ येथील अशोक शंकर मोरे यांची शेती व आंबा झाडे वाळु तस्करांनी उध्वस्त केल्याची तक्रार ८ ऐप्रील २०१० रोजी राज्यपाल , मुख्यमंत्री, महसूल, पोलिस विभागाला त्यांनी केली होती त्यानंतर सुमारे १०० अर्ज करून सरकारचे दोनशे आदेश प्राप्त होऊनही महसूल विभागाने गेली ११ वर्ष याकडे दुर्लक्ष्य केले. मात्र आता थेट ११ वर्षांनी महसुला जाग आलीेये वाळू वाहतूक करणाऱ्या चौघांची महसूल विभागाकडुन गावात येऊन चोकशी सुरू झालीये. ११ वर्षे पाठ पुरावा करून ८ जून २०२१ रोजी संगमनेर प्रांत अधिकारी डॉ शषिकांत मंगळुरे यांनी निंब्रळ येथे येऊन चौकशी केलीये. यामुळे ११ वर्षानंर वाळु तस्करांवर काय दंडात्मक कारवाई होतेये हे पाहन महत्वाच राहील.