अँटिलिया स्फोटक प्रकरणी अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक घटनास्थळी पोहोचले. त्या परिसराची पूर्ण माहिती घेण्यात येत असून त्यासंदर्भातील प्रश्न सचिन वाझे यांना विचारण्यात आले. त्यानंतर वाझे यांना ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी याचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. याप्रकरणाचा तपास एनआयए करीत असून निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझेंना घेऊन आज एनआयएचे पथक अँटिलिया इमारतीच्या परिसरात गेले. अँटिलियासह माहीम व वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथेही नेण्यात आले. यावेळी एनआयएकडून सचिन वाझे यांना काही प्रश्न देखील विचारण्यात आले. त्यानंतर सचिन वाझे यांना ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले.