ताज्या बातम्या

झिशान सिद्दीकी, सलमान खान धमकी प्रकरण; 20 वर्षीय तरुणाला अटक

झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. धमकीचा फोन आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात हा धमकीचा फोन आला.

फोनवरील व्यक्तीने झिशान सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्याची माहिती मिळत असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली.

झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव गुरफान खान असल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 6 नोव्हेंबरला मुंबईत सभा

Satara: जिल्ह्यात 215 जणांचे अर्ज; चुरस वाढली

राजकीय पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; नाराजांकडून थेट अपक्ष अर्ज

नवी मुंबईच्या खारघरमधून 27 लाखांचं ड्रग्ज जप्त

Salman Khan : अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी