उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशात उद्योग यावेत म्हणून मुंबईतील काही उद्योगपतींशी ते चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर महाविकास आघाडीकडून आरोप केले जातात.
याच पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले की, “मुंबई ही मुंबई आहे. हे शहर अर्थभूमी आहे. तर उत्तर प्रदेश राज्य हे धर्मभूमी आहे. या दोघांचा सुंदर संगम होऊ शकतो. मुंबईतील फिल्मसिटी घेऊन जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र आम्ही आमची स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत,” असे त्यांनी सांगितले.