दिवाळी सण हा भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच प्रमाणे भारतात दिवाळीचे महत्त्व हे फार मोठे आहे. अशातच यवतमाळच्या शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. याचे कारण म्हणजे लूट मारणारे व्यापारी. दिवाळी सारख्या सणांमध्ये या शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल हे भाकरी आणि बेसन खावून त्यांना फेडावे लागत आहे. शेतकऱ्यांनी अतिशय कष्टाने व रात्रंदिवस एक करून शेतमाल पिकवला.
हाच शेतमाल विकण्याची वेळ आली असताना शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे. यामध्ये सोयाबीनचे ३२०० ते ३५०० भाव देऊन खरेदी सुरु आहे. कापसाची एमएसची रू.७५८१ असताना देखीस शेतकऱ्यांना खेडा खरेदी नुसार ६२००/- ते ६४०० भाव देवून खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची लुट करीत आहे.
खेडा खरेदी म्हणजे, व्यापारी शेतकऱ्यांकडून खेड्यांमधून तसेच गावागावात जाऊन शेतमालाची खरेदी करतात. यात शेतमालाची किंमत, लिलाव न करता ठरत असते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात काळी दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी बेसन, भाकर, चटणी खाऊन दिवाळी साजरी केली.