Yasin Malik team lokshahi
ताज्या बातम्या

Yasin Malik : ...म्हणून यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा, 'या' काश्मीर फुटीरवादी नेत्यांवरही आरोप

Published by : Shweta Chavan-Zagade

काश्मिरी फुटीरतावादी नेता यासीन मलिक (Yasin Malik) याच्या शिक्षेच्या मुदतीवर दिल्ली न्यायालय आपला निकाल दिला असून यासीन मलिकला जन्मठेपची शिक्षा सुनवण्यात आली आहे. तसेच यासीन मलिकला 10 लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख असलेल्या मलिकला बेकायदेशीर क्रियाकलाप (Terror Funding Case) प्रतिबंध कायद्यांतर्गत आरोपांसह दहशतवादासाठी वित्तपुरवठा प्रकरणी सर्व आरोपांत दोषी ठरवले आहे.

राष्ट्रीय तपास पथकाच्या (1NIA) कोर्टाने गुरुवारी यासिन मलिकला दोषी ठरवलं आहे. यासिनमलिकनं कोर्टातील सुनावणीदरम्यानं काश्मीरमधील दहशवतादी घटनांमध्ये सहभागी असल्याचं मान्य केलं होतं. यासिन मलिकला दिल्लीतील पतियाळा कोर्टात आणलं गेल्यानंतर त्याच्या शिक्षेवर युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टानं निर्णय राखून ठेवला होता. पतियाळा कोर्टाबाहेर सीएपीएफ आणि विशेष दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. पतियाळा कोर्टात उपस्थित असलेल्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार यासिन मलिक न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणार नाही, अशी माहिती दिली आहे.

काश्मीर फुटीरवादी नेत्यांवरही आरोप

10 मे रोजी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद यांना अटक केली होती. जहूर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यासह इतर काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले.

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी मलिकच्या आर्थिक स्थितीचं आकलनं करण्याचे निर्देश दिले होते. कारण दंडाची रक्कम निश्चित केली जावी. याप्रकरणात मलिकला जास्तीत जास्त मृत्यूदंडाचा सामना करावा लागू शकतो. तर त्याच्या गुन्ह्यासाठी कमीत कमी शिक्षा जन्मठेप आहे. यासीनने १० मे रोजी कोर्टाला सांगितलं होतं की, आपल्याविरोधात लावलेले दहशतवादी कलमं, दहशतवादी फंडिंग, दहशतवादी कारवाया, देशद्रोह, फसवणूक अशी कृत्ये करणार नाही.

यासिन मलिकला आरोप मान्य

यासिन मलिकने न्यायालयाला सांगितले होते की, मी माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचा विरोध करत नाही. आरोपांमध्ये UAPA चे कलम 16 (दहशतवादी कृत्ये), 17 (दहशतवादी कृत्यांसाठी निधी गोळा करणे), 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट) आणि 20 (दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्य असणे), भारतीय दंड संहिता 120-बी (गुन्हेगारी कट), 124-A (देशद्रोह) यांचा समावेश आहे.

दिल्ली न्यायालयाने यापूर्वी फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद यांना अटक केली आहे. वताली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवल किशोर कपूर यांच्यासह काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर शाह यांनी औपचारिकपणे आरोप निश्चित केले. लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांच्याविरुद्धही आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, ज्यांना या प्रकरणात गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे.

कोण आहे यासिन मलिक ?

  1. जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता

  2. 80च्या दशकात 'ताला पार्टी' संघटनेची स्थापना

  3. 1987 साली विधानसभ निवडणुकीत ISL मुस्लिम युनायटेड फ्रंटमध्ये सामील आणि प्रचार

  4. 1988 साली मलिक जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट अर्थात JKLF चा एरिया कमांडर

  5. 1990 साली भारतीय हवाई दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आरोप

  6. जम्मू काश्मीरमधील तरुणांची माथी भडकवण्याचा आणि हाती बंदूक घेण्यास प्रेरित केल्याचाही आरोप

  7. टेरर फंडिंग प्रकरणात मलिकवर गुन्हे दाखल

  8. वयाच्या 14 वर्षापासून काश्मिरसाठी हाती शस्त्र घेऊन हिंसाचार

  9. यासिन मलिकवर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप सिद्ध

  10. दहशतवादी कृत्यांना फंडिंग केल्याचा मलिकवर आरोप सिद्ध

या काश्मीर फुटीरवादी नेत्यांवरही आरोप

Mumbai High Court: मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं सोमवारी भूमीपूजन

वायू प्रदूषण आणि उष्णतेमुळे ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे वाढली; जगात अशा लोकांची संख्या पोहोचली 1.19 कोटींवर

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा