थोडक्यात
यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राहुल गांधींवरील टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीसांना 'नक्षलवादाचा अर्थ कळतो का, असा प्रश्न उपस्थित केला.
ठाकूर यांनी फडणवीस यांना इशारा दिला की त्यांनी अधिक सांभाळून बोलावं, कारण गांधी कुटुंबाने देशासाठी सर्व काही समर्पित केलं आहे आणि फडणवीस हे त्याचा योग्यपणे आदर करायला हवेत.
ठाकूर यांनी सांगितले की, फडणवीस यांना त्यांच्या वक्तव्यांसाठी नक्कीच शिक्षा मिळेल, आणि राहुल गांधींवर बोलताना त्यांनी तोंड सांभाळूनच वक्तव्य केलं पाहिजे.
देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना नक्षलवादाच्या मुद्द्यावरून घेरले आहे. यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा देत देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवादाचा अर्थ तरी करतो का असा प्रतिसावाल उपस्थित केला आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांनी खूप सांभाळून बोललं पाहिजे. गांधी घराण्याने देशासाठी स्वतःच संपूर्ण कुटुंब वाहून टाकला आहे. देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवादाचा अर्थ तरी कळतो का संविधानाचा पूजन करणाऱ्याला तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणत असाल तर तुमचा खेळ आहे. याची शिक्षा फडणवीस यांना नक्की मिळणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विषयी बोलताना फडणवीसांनी तोंड सांभाळून वक्तव्य केलं पाहिजे असा निर्वाणीचा इशारा यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांना दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
भारत जोडो’च्या नावाखाली अराजकता परवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजात विद्वेष निर्माण करण्याचं काम होत आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही, अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की, लोकांची मनं प्रदूषित करायची, त्यांच्यामध्ये अराजकता रोपण करायचं, जेणेकरून देशातील संस्था, सिस्टीम याच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल. देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल, हेच काम अराजकता पसरवण्याचे काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे.