कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. विषाणूच्या रुग्णामध्ये 78 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर या काळात मृत्यूची नोंद 19 वरून 29 झाली आहे.
यातच आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोकं वर काढलं आहे. या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. देशात कोरोनाच्या XBB.1.16 व्हेरियंटचे आतापर्यंत 610 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या नव्या XBB.1.16 व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सापडले आहेत.
कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळे सरकारने सावधगिरी खबरदारी बाळगण्यास सांगितलं आहे. सध्या देशात XBB.1.16 व्हेरियंटचे रुग्ण अधिक आढळून येत आहे.