गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भाषणानंतर मनसेने आपला राजकीय अजेंडा हा कट्टर हिंदुत्तवाकडे (Hinduism) वळवला असल्याचं दिसतं आहे. मनसेने आपली भुमिका हिंदुत्त्वाकडे वळविल्यामुळे राज्यातील सरकारकडून मनसेवर टीका होत असली तरीही, भाजपकडून (BJP) मात्र मनसेच्या ह्या भुमिकेचं स्वागत करण्यात आलं. येत्या 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनादिवशी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.
सध्याची परिस्थिती पाहता राज ठाकरे ह्यांची सभा व त्यांचा हिंदुत्त्वाचा मुद्दा हा केवळ राज्यापुरताच मर्यादित राहिलेला नसून, संपूर्ण देशभरातील हिंदुत्तववादी संघटनांकडून त्यांच्या भुमिकेचं स्वागत केलं जात आहे तसेच त्यांना पाठिंबाही दर्शविला जात आहे. आता राज ठाकरेंच्या 1 मे रोजी होणार असलेल्या औरंगाबाद येथील सभेला थेट अयोध्येवरून (Ayodhya) कार्यकर्ते येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अयोध्येतील बॅनरबाजी:
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी हिंदुत्ताची भुमिका स्वीकारल्यानंतर अयोध्येमध्ये राज ठाकरे ह्यांचे 'हिंदू जननायक' असे लिहीलेले बॅनर लाविण्यात आले होते.
ह्या सर्व मुद्दयांचा विचार करता महाराष्ट्र नवनिर्माण सेना व पर्यायाने राज ठाकरे हे भविष्यामध्ये राष्ट्रीय राजकारणात पाहायला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.